पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/105

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



भाग ६ वा.
---------------
झाडांपासून इतर उपयोग.

 आतां, झाडांपासून आणखी काय काय फायदे आहेत, याजबद्दल विचार करूं.

दहिवर.

 आपल्या देशामध्ये दोन प्रकारची पिके होतात, हे सर्वांस ठाऊक आहेच. एक खरीपाचे पीक व दुसरें रबीचे पीक. खरीपाचे पिकाची पेरणी पावसाळ्याचे आरंभीं होऊन पिके निघण्याचा हंगाम दसऱ्याचे सुमारास असतो. अशा प्रकारची पिके म्हटली म्हणजे तांदूळ, बाजरी, ज्वारी, तुर वगैरे होतः रबीचे पिकाचा पेरणी हस्तचित्राचे वळिवाचे पावसाने होऊन माघ–फाल्गुनांत पिके निघण्याचा हंगाम असतो. गहू, हरबरा, वाटाणा, शाळू वगैरे पिके ह्या जातीचीं होत. खरीपाचे पिकास पाऊस जास्त लागतो. व मृगनक्षत्रांपासून जे झडीचे पाऊस लागतात, त्यांच्या योगानें ही पिकें होतात. रबीची पिके पाऊस पडून जमिनीमध्ये पेरण्यापुरता ओलावा झाला म्हणजे पेरतात. नंतर एकादा पाऊस झाला म्हणजे, अधिक पावसाचे पाण्याची जरूर लागत नाहीं. पिकाचे वाढीस ओलावा दहिंवरापासून मिळतो.

 बंगाल प्रांतामध्ये भाताचे उत्पन्न फार आहे. बाकी उत्तर हिंदुस्तानात पंजाब, वायव्येकडील प्रांत, वगैरे बहुतेक ठिकाणीं रबी