पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/102

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८९

पांचपन्नास वर्षांपलीकडे ज्या झऱ्यांंस पाण्याचा विपुल पुरवठा होता, त्यांपैकी कित्येक झरे हल्ली अगदी आटले आहेत. व कित्येकांस

-----
( मागील पृष्ठावरून पुढे चालू ).

लोटा सोडून पाहिल्याशिवाय समजावयाचें नाहीं. ह्याप्रमाणे त्याने पाहिले तो विहीर कोरडी ! थोडीशी निराशा होऊन तसाच पुढे चालू लागला, ते दुसरी विहीर दृष्टीस पडली. तिजमध्ये लोटा सोडून पाहतो तो तीही विहीर कोरडी !! अशा आणखीही कांहीं विहिरी लागल्या, परंतु सर्वांची स्थिति एकच !! दोन प्रहरची वेळ झाली, तहानेने जीव व्याकुल होऊ लागला व त्यांत निराशेची भर पडली !! मग काय विचारावें ! परंतु करतो काय ! तसाच पुढे चालला तों आणखी एक विहीर दृष्टीस पडली. ह्या विहिरीजवळ मात्र थोडी जागा ओली झाली होती, व तिजवर थोडे हिरवें गवतही उगवले होते. ह्या विहिरीमध्ये खास पाणी आहे म्हणून आशा वाटून त्याने मोठ्या उत्सुकतेने लोटा सोडला. परंतु तींतही पाण्याचा ठणठणाठ !! आता मात्र त्याची कंबर बसली, व मरण जवळ आले असे समजून तो ढळढळां रडू लागला. इतक्यांत त्या वाटेने तिकडचा माहितगार असा एक इसम जात होता तो तेथे आला व त्यास रडण्याचे कारण विचारू लागला. तेव्हां--

 पहिला प्रवासी:- मी तहानेने व्याकुल झाला आहे; परंतु मी किती कमनशिबी आहे पहा ! कालपर्यंत ह्या विहिरीस पाणी असून माझ्या दुर्दैवाने ते आजच आटलें !

 इसमः--कालपर्यंत पाणी होते म्हणून कशावरून तू म्हणतेस ?

 प्रवासी:--हे पहा, एथे थोडी जमीन भिजली आहे व तिजवर थोडे हिरवे गवतही उगवले आहे.

 इसमः--बाबा, तूं कमनशिबी आहेस असें नाहीं; ही विहीर अशीच सर्वांस फसविते. जमीन ओली झालेली आहे व गवत उगवले आहे ते विहिरीच्या पाण्याने नव्हे; तर तुझ्यासारख्या प्रवाशांनी एथे अश्रू ढाळले आहेत त्याने !!