पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/101

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



८८

पडतो त्या ठिकाणीं टेंकड्या, डोंगर, पर्वत वगैरे उच्च स्थाने असल्यापासून किती फायदे आहेत, हे सांगणे नको. आमचा देश डोंगराळ नसून सपाट असता, तर पावसाचे पडलेले सर्व पाणी वाहून गेले असते, किंवा जमिनीमध्ये मुरून खोल गेले असते. मग ते आम्हांस झऱ्याच्या रूपाने जमिनीवर मिळाले नसते, विहिरी खणून पाणी लागले असते. परंतु विहिरीसुद्धा अतिशय खोल खणाव्या लागल्या असत्या. अतिशय खोल विहिरी बागाइतास अगदीं निरुपयोगी होत. अशाच प्रकारची स्थिति आपल्याकडे देशामध्ये कांहीं कांहीं ठिकाणी आहे. विजापूर जिल्ह्यामध्ये व धारवाडचे पूर्व बाजूस पाण्याचा वारंवार दुप्काळ पडतो व विहिरी फार खोल असल्यामुळे एक घागरभर पाणी काढावयाचे झाले, तर दोर उचलण्यास आणखी एक मनुष्य बरोबर न्यावा लागतो. अशी स्थिति मध्य हिंदुस्थानांतील वाळवंटामध्ये म्हणजे मारवाडामध्ये आहे. वाळूचा प्रदेश सपाट व भुसभुशीत असल्यामुळे पडलेले पाणी फार खोल जाते, म्हणून विहिरी फार खोल खणाव्या लागतात.

-----

 १ एथं एक हरदासी गोष्ट मनोरंजक आहे, म्हणून सांगतो. मारवाड देशामध्ये पाण्याचा दुष्काळ व विहिरी अतिशय खोल असतात. म्हणून कोणी मनुष्य प्रवासास निघाला म्हणजे प्रवासाची प्रथम सामुग्री म्हणजे एक लोटा व सुताची एक लांब रसी ही होय. ह्याप्रमाणे सामुग्री घेऊन एक जण प्रवासास निघाला. ऊन झाल्यामुळे व हवा रुक्ष असल्यामुळे त्यास तहान लागली व तो पाण्याचा शोध करू लागला. कर्मधर्मसंयोगाने लौकरच एक विहीर त्याच्या दृष्टीस पडली. तिकडच्या विहिरी खोल व आंत अंधारगुडुप ! यामुळे विहिरीमध्ये पाणी आहे किंवा नाहीं हें