पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४९ )


लेंच आहे. नेटिव्ह शिपायांनी ज्या कारणांनी बंड केलें तीं कारणें येथें सांगण्याची आवश्यकता नाहीं; तथापि त्यांच्या बंडामुळे कांहीं थोड्या काळपर्यंत इंग्लि- शांच्या हिंदुस्थानांतील सत्तेची चलबिचल झाली होती, ही गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे. त्यांनीं तें कंड मोडून टाकिलें ही गोष्ट महत्त्वाची नाहीं; पण तें कोण- त्या रीतीनें मोडिलें, हें समजणे महत्त्वाचें आहे.वं- डाच्या वेळचें हावलाक साहेबाचें शौर्य व लार्ड लारेन्स साहेबाचें धैर्य, ह्यांविषय इतिहासांत सविस्तर माहिती आहेच; फार कशाला, पुष्कळ वृद्ध मनुष्यांस त्या वेळच्या त्या गोष्टीहि प्रत्यक्ष आठवत असतील. परंतु दुसऱ्या कित्येक गोष्टी जर अनुकूळ नसत्या तर इंग्लिशांच्या नुसत्या शौर्यानेंच बंड कधींहि मोडलें गेलें नसतें. २००० बंडवाल्यांस १ इंग्लिश शिपाई ह्या प्रमाणानें बंडवाल्यांची संख्या होती; तर इतक्याशा इंग्रजांना बंड मोडून हिंदुस्थानांत सर्वत्र शांतता कधींहि राखितां आली नसती.मोडलें गेलें नसतें.मोडलें गेलें नसतें.

 नेटिव्ह लोकांत एकी नव्हती म्हणूनच इंग्लि- शांस हिंदुस्थानची सत्ता प्राप्त झाली होती; व ह्याच बंड मोडले त्याचा कारणानें नेटिव्ह शिपायांकडूनच नेटिव्ह शिपायांचें बंडहि त्यांना मोडितां आलें. प्रकार. जर नेटिन्हांत एकी असती तर ह्या दोन्हीहि गोष्टी घड- ल्या नसत्या. प्रथमतः बंडाचा उद्भव खरोखर नेटिव्हमोडलें गेलें नसतें.