पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४७)

चांगले पगार देऊन कवायत शिकलेलें सैन्य ठेवणे, ह्या तीन गोष्टींच्या अनुकूलतेमुळेंच ईस्त इंदिया कंपनीला तिच्या प्रतिस्पर्ध्याशीं टक्कर मारण्याचें सामर्थ्य आलें. परंतु इतक्या ३च गोष्टी तिला अनुकूल होत्या, अर्से नाहीं. दारूगोळ्यानें भरलेले व वेढा घातला असतांहि घेतां येणार नाहीत, असे मजबूत किल्ले तिच्या ताब्यांत होते. शिवाय ही कंपनी इंग्लिशांची असल्यामुळे तिला इंग्लिश सरकारचा मोठाच पाठिंबा होता. इंग्लिश आरमाराच्या वर्चस्वामुळे इंग्लंदाशीं तिर्चे दळणवळण निर्भयपणाचें झालें होतें; इतकेंच नव्हे, तर त्या आरमा- रामुळें फ्रेंचांस युरोपांतून मदत येण्यास प्रतिबंध झाला होता. तसेंच, इंग्लिश सरकारास पैसे दिले असतां त्या सरकाराकडून कंपनीला शिपाईहि मिळत असत; आणि क्लैव्ह साहेबाच्या वेळेपासून कवायत शिकविलेल्या कांहीं पलटणी नेहमी तिच्या पदरीं असत. ह्या सर्व गोष्टी अनुकूळ असल्यामुळेंच कंपनीचें तिच्या प्रतिस्पर्ध्या- वर वर्चस्व झालें.

 अखेरीस इंग्लिशांपासून नेटिव्ह संस्थानांसाह नेहमीं फायदे होऊं लागले. एखाद्या नेटिव्ह संस्थानांत दंगे वगैरे सुरू झाल्यास कंपनी हातांत तरवार घेऊन लढण्यास तयार होई; व त्यामुळे तेथें शेवटीं सुव्यवस्था होऊन उत्तम राज्यकारभार सुरू होई, जेथें ऐक्य व शांतता असे, अशा संस्थानांबरोबर तिला लढाया कर-