पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४५ )

ऐक्याचा अभाव; व (२) नेटिव्हांच्या शूर परंतु कवायत न शिकलेल्या सैन्याशी लढण्यास इंग्लिशांचें कवायत शिकलेले सैन्य.

 मोगलांच्या सार्वभौम सत्तेच्या हासानंतर मोग- लांचे मांडलिक राजे, हिंदु सरदार, व बंडखोरांचे पुढारी ( पेंढारी वगैरे ) हे सर्वच अधिकारासाठी भांडूं लागले. ह्याप्रमाणें अधिकारप्राप्तीसाठीं जो हा कलह सुरू झाला, त्यांत इंग्लिश व्यापारीहि पडले. सर्वांत अधिक योग्य- तेचा जो असतो तोच भांडणांत यशस्वी होतो, ह्या दार- विन नांवाच्या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याच्या मताप्रमाणें ह्या भांडणांत इंग्लिश व्यापारीच यशस्वी होऊन सर्वांत अधिक योग्यतेचे ठरले. तथापि ह्या प्रकरणाचा अधिक विचार केला पाहिजे; व इंग्लिश व्यापारी व त्यांचे प्रतिस्पर्धी ह्यांस ज्या साधक बाधक गोष्टी होत्या, त्यांची सुलना केली पाहिजे; आणि नंतर इंग्लिश व्यापाऱ्यांचें वर्चस्व होण्याचे कारण शोधिलें पाहिजे. प्रत्येक परिणा- मास कारण असतेंच, व हल्लींचें कारण शोधण्यास आपणांस दूर जावयास नको.

 इंग्लिश व्यापाऱ्यांना पहिली मोठी अनुकूल गोष्ट म्हटली म्हणजे त्यांची मंडळी (कंपनी) होती, ही होय. कंपनी असणें ही गोष्ट फायदेशीर कशी, हें प्रथम दर्शनीं ध्यानांत येणार नाहीं; म्हणून आपण ह्याचा जास्त विचार करूं. “एक्स्पॅन्शन् ऑफ इंग्लंड" (इंग्लंद-