पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३९)

 परंतु हीं त्याची कृत्यें इंग्लंदांत पसरली तेव्हां कंपनीच्या अमलाविरुद्ध मोठी ओरड झाली. प्रसिद्ध वक्ता व मुत्सद्दी जो बर्क साहेब यानें नेटिव्ह लोकांचा पक्ष घेतला; व हेस्टिंग्स् ह्याला त्याच्या वर्तणुकीबद्दल दूषण देण्यांत येऊन त्याची चौकशी झाली. पुष्कळ वर्षे ही चौकशी चालून अखेरीस तो दोषमुक्त झाला. परंतु प्लासी व वांदिवाश येथील लढाया ज्याप्रमाणें हिंदु- स्थानच्या इतिहासांत अति महत्त्वाच्या आहेत, त्याचप्र- माणें ही चौकशीहि फार महत्त्वाची आहे; कारण ह्या चौकशीमुळे कंपनीच्या अमलांत फार सुधारणा झाली. आजपर्यंत कंपनीचा अंमल म्हणजे नेटिव्ह लोकांस मोठा तळतळाट असे; परंतु ह्यापुढें तो सुखप्रद होऊं लागला. व्यापार करणें व राज्य करणे असे दोन्ही अधिकार आजपर्यंत कंपनीकडे होते; परंतु ह्यापुढें हे दोन्ही अधि- कार एकाचकडे असूं नयेत, असें पार्लमेंटानें ठरविलें.

 ह्या हालचालीमुळेच " इंदियन सिव्हिल सव्हिस" (हिंदुस्थानांतील सुलकी काम चालविणाऱ्या अधिकाऱ्यांची इंदियन सिव्हिल मंडळी ) निघाली. हिंदुस्थानांतील इंग्लिश सव्हिस, जज्य, माजिस्त्रेट, कलेक्टर व इतर काम-

गार ह्यांचा ह्यांत समावेश होतो. ह्या लोकांचा व्यापा- राशी कांही संबंध नव्हता. त्यांस चांगला पगार मिळे; व ह्यामुळे लांच घेण्याचा त्यांस कोणत्याहि प्रकारें मोह पडत नसे. जे नेटिव्हांवर प्रेम करीत असत, व ईश्वरे-