पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३८)

हिंदुस्थानांतील दुसरा मोठा गव्हर्नर जो वारन हेस्तिग्स् ह्याच्या कारकीर्दीत पार्लमेंटानें हें प्रकरण हातीं घेतलें. ह्याच्या कारकीर्दीतच म

कंपनीच्या राज्यव्यव
स्थेसंबंधानें पार्लमेंटानें द्रास,
केलेली सुधारणा.

मुंबई व बंगाल हे तीन इलाखे
ह्या नवीन
एकत्र करून त्यांजवर बंगालच्या


गव्हर्नरास “गव्हर्नर जनरल " असा हुद्दा देऊन मुख्य नेमण्याचा ठराव झाला. ठरावाप्रमाणें वारन हेस्तिग्स हाच पहिला गव्हर्नर जनरल झाला. दुप्लीसारखाच हेस्तिग्स् हुशार होता; व दुप्लीनें जो बेत योजिला, परंतु जो त्याला सिद्धीस नेतां आला नाहीं, तो बेत ह्यानें सिद्धीस नेला. कित्येक राजांब- रोबर त्यानें लढाया केल्या, कित्येकांविरुद्ध त्यानें खल- बतें केलीं, व सर्व कामांत त्यास यश येत गेलें, हैदरअल्ली हां एक साहसी शिपाई होता, व त्यानें स्व- सामर्थ्यानें आपणास म्हैसूरचा सुलतान केलें होतें, आणि इंग्लिशांस हिंदुस्थानांतून हकलून लावण्याचें भय घातलें होतें. ह्या हैदरअल्लीपासून त्यानें मद्रासचें संरक्षण केले. अयोध्येच्या राजाविरुद्ध खलबत करून त्याजपासून त्यानें अतोनात पैसा उकळिला; व ह्या पैशानें दायरेक्तर लो- कांचें शांतवन करून हैदरअल्लीशी लढाया करण्यांत आले- ला खर्च भरून काढिला. आपल्या रयतेस दावांत आण ण्यासाठीं एखाद्या नेटिव्ह राजानें कंपनीचे शिपाई मदत घेण्याची इच्छा दर्शविल्यास पैसे घेऊन त्या राजास तो मदतहि देत असे,