पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( ३२ )

त्यांस कवायत शिकविली व नेटिव्हांच्या भांडणांत तेहेि पडू लागले. अर्थात् ते नेहमी फ्रेंचांच्या उलट बाजूला मिळत. ह्यामुळे फ्रेंचांच्या व इंग्लिशांच्या वसाहतींत साहजिकच उघडपणें लढाई सुरू होई; आणि युरोपांत व अमेरिकेंत इंग्लिश व फ्रेंच ह्यांचें युद्ध सुरू होई तेव्हां हिंदुस्थानांतहि त्यांच्यांत युद्ध सुरू होई.
 आज फ्रेंचांचा जय तर उद्यां इंग्लिशांचा जय होई; व ह्यामुळे मद्रास आणि पांदिचेरी हीं वारंवार एकाच्या ताब्यांतून दुस-याच्या ताब्यांत जात येत असत. फ्रेंच लोक स्वतःच इंग्लिशांच्या वसाहतींवर हल्ला करून राहत नसत; तर नेटिव्ह संस्थानिकांसहि तसे करण्याविषयीं ते भर देत; व अशा रीतीने दोहोंकडून घेरल्यामुळे इंग्लिश व्यापा-यांस जीव की प्राण होत असे. परंतु इंग्लिशांच्या सुदैवानें दुप्लीस त्याच्या स्वतःच्या सरकाराकडून कांहींच मदत मिळाली नाहीं. त्याच्या बुद्धीची परीक्षा फ्रेंच सरकारास करितां आली नाहीं. जर करितां आली असती तर जर्मनीत ज्या फेंच शिपायांची निष्कारण कत्तल होत होती, त्यापैकी काही शिपाई फ्रेंच सरकाराने हिंदुस्थानात दुप्लीच्या मदतीस पाठविले असते; आणि ह्या शिपायांनी जगाचा इतिहास फिरवून टाकिला असता. सारांश, दुप्लीला फ्रेंच सरकारानें मदत तर केली नाहींच; परंतु उलट त्यास स्वदेशीं परत बोलाविलें. त्याच्या योग्यतेचा एकही फ्रेंच सरदार पुढे हिंदुस्थानांत आला नाहीं.