पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( २७ )

ईस्त् इंदिया कंपनी ही एक कंपनी होती. हीमध्यें अनेक भागीदार होते; व कामाच्या व्यवस्थेकरितां ते आपल्यांतीलच कांहींजणांस निवडीत असत; त्यांना दायरेक्तर्स म्हणत असत. एलिझाबेथ राणीच्या मरणापूर्वी थोडेच दिवस म्हणजे इ.स. १६०० त ही कंपनी स्थापित झाली होती; व इंग्लिश सरकाराकडून हिला व्यापार करण्याविषयी सनद मिळाली होती.
कंपनीची आरंभीची ठिकाणे
 ह्या कंपनीनें प्रथमतः इ.स. १६११ त सुरत येथें वखार घातली. नंतर १६३९ त मद्रास येथें दुसरी वखार घातली. हीं दोन्ही ठिकाणें ठिकाणें दक्षिण हिंदुस्थानांत असून पहिलें पश्चिम किना-यावर व दुसरें पूर्व किना-यावर आहे. ज्या जमिनीवर त्यांनीं आपल्या वखारी वांधिल्या होत्या ती जमीन त्या त्या ठिकाणच्या मुख्य अधिका-यांपासून त्यांनीं भाड्यानें घेतली होती. एखाद्या जर्मन मनुष्यास *लीडस् येथे एखादा कारखाना स्थापावयाचा झाला, तर ज्याप्रमाणें कोणा तरी जमिनदारापासून आपल्याला घरें वगैरे तो भाड्याने घेतो, त्याचप्रमाणें कंपनीनें हिंदुस्थानांत केलें. कंपनीचें तिसरें ठिकाण मुंबई बेट होय. स्पेन देशांतील लोकांशी लढण्यासाठीं पोर्तुगीज लोकांना इंग्लिशांनी जी मदत केली, तिच्यामोबदला पोर्तुगीज
________________________________________________________________________________ * हें शहर इंग्लंदांत यांर्कशायरमध्यें एर नदीच्या कांठी असून लोकरीच्या कारखान्याकरीता प्रसिध्द आहे.