पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( २१ )

परंतु त्यांतून जाण्या येण्यास खिंडी नसत्या तर तो फार फायदेशीर झाला असता. नकाशाकड़े थोडेंसें लक्ष दिल्यास असें दिसून येईल कीं, सिंधु नदीस येऊन मिळणा-या एका नदीचा उगम अफगाणिस्थानांत असून खैबर खिंडीच्या रस्त्यानें पर्वतामधून ती हिंदुस्थानांत वाहत येते. ज्या खिंडींतून स्वाऱ्या करणारे लोक असंख्य वेळा आले आहेत ती हीच खैबर खिंड होय. सिंधु नदीस येऊन मिळणा-या ह्या नदीवरच अफगाणिस्थानची राजधानी जें काबूल शहर तें वसलेलें आहे. काबूलच्या कांहीं पश्चिमेकडे हिरात हें शहर आहे. म्हणून हिरात ज्याच्या कबज्यांत आहे त्याला काबुलास येण्यास कांहींच अडथळा राहिला नाही. ह्याप्रमाणें तो काबूल येथें येऊन दाखल झाला म्हणजे, हिंदुस्थानावर स्वा-या करणारे लोक ज्या नदीच्या कांठांनीं ह्या देशांत शिरले होते, त्या नदीशीं तो येऊन ठेपला, असें होईल.
हिंदूंची (आर्यांची) स्वारी
 ह्या रस्त्यानेंच एकामागून एक विजयी लोक हिंदुस्थानांत आले असून त्यांची लांबच लांब मालिका लागून गेली आहे. ती फार मोठी असून इतकी प्राचीन काळापर्यंत पोहोंचली आहे कीं, तिचा पाठीमागे तल्लास लावीत जाण्याचा प्रयत्न करूं लागलों, तर आपली कल्पना-शक्ति गुंग होऊन जाईल. तथापि हिंदु (आर्य), अफगाण व मोगल ह्या ३ लोकांनीं हिंदुस्थानावर ज्या