पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( २० )

तुलना केली असतां हा देश एक उत्कृष्ट बगीचाच आहे, असें म्हणण्यास हरकत नाहीं. सिंधु व गंगा ह्यांच्या पाण्यामुळे अतिशय सुपीक झालेली मैदानें कोणीकडे, व हिमालय पर्वताच्या उत्तरेस व पश्चिमेस असणारे उंच डोंगरसपाटीच्या जमिनीचे नापीक प्रदेश कोणीकडे? ह्या दोहो प्रकारच्या प्रदेशांच्या सुपीकपणांत विलक्षण तफावत आहे. म्हणून त्या नापीक प्रदेशांत राहणा-या लोकांचे थव्यांचे थवे हिमालयामधील खिंडीतून, दूध व मध ह्यांचा प्रवाह ज्यांतून वाहत आहे अशा ह्या हिंदुस्थानांतील फार सुपीक प्रदेशांत येण्याविषयीं हजारों वर्ष उत्कंठीत असत, ह्यांत नवल तें काय? उद्यां रशियाच्या मनांत जर हिंदुस्थानावर स्वारी करावयाचें आलें तर त्यांतहि कांहीं विशेष नाहीं. कारण मध्य एशियेंतील लोकांनीं आजपर्यंत ज्या कारणानें अनेक वेळां स्वा-या केल्या, तेंच कारण रशियालाहि स्वारी करण्याविषयीं मोह उतन्न करण्यास पुरे आहे. असें झालें असतां ज्या अनिवार मोहामुळे मध्य एशियेंतील डोंगरी लोकांनीं हिंदुस्थानांतील लोकांस लुटून स्वतःस श्रीमंत केलें, त्याच अनिवार मोहाला रशियन लेकहि वश झाले, एवंढेच काय तें होईल. तसेंच रशियन आले तरी तेहि मध्य एशियेंतील लोक ज्या मार्गानें आले होते त्याच मार्गानें येणार.
 हिमालय पर्वत हिंदुस्थानाला गांवकुसाप्रमाणें आहे खरा,