पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३८)

परंतु ३ज्या वर्गांतील वसाहतींचें महत्त्व, त्या विशेष ठिकाणीं असल्यामुळे जाण्या येण्याच्या संबंधानें त्यांचा त्यांना जो उपयोग होतो, त्या संबंधानेंच आहे. ब्रि . टिश बेटांतील लोकांना तेथें जाऊन स्थाइक वस्ती कर- ण्यास किंवा व्यापारधंद्यास त्यांचा साक्षात् उपयोग नस- ल्यामुळे त्या दृष्टीनें त्यांच्या महत्त्वाची कल्पना करितां यावयाची नाहीं.

 ब्रिटिश राष्ट्रांतील एकंदर प्रदेशाचा विस्तार केवढा आहे त्याविषयीं आतां विचार करावयाचा. त्याचें क्षेत्रफळ ८० लक्ष चौरस मैल आहे, असें नुसतें सांगि- वसाहतीसंबंधी रा ज्याचा विस्तार. तलें तर एवढ्या आंकड्यावरून त्याच्या विस्ताराची वास्तविक कल्पना चांगलीशी व्हावयाची नाहीं. म्हणून तुलनेच्या रूपानें तो विस्तार ध्यानांत आणिला पाहिजे. युरोप व एशिया ह्यांच्या नकाशाकडे एखाद्यानें दृष्टि दिली असतां रशियाच्या बादशहाच्या ताब्यांतील प्रदेशाचा प्रचंड विस्तार पाहून तो एकदम चकित होऊन जातो. तथापि ब्रिटिश प्रदेशाच्या गणनेंत हिंदुस्थान धरिलें असतां पृथ्वीवर सर्वत्र पसरलेल्या राणच्या अमलांतील ह्या प्रदेशाचा विस्तार रशियाच्या विस्तारापेक्षां नें अधिकच भरेल! एका दृष्टीनें ह्या विस्ताराचा असा विचार झाला. आतां युनायूतेद स्तेत्स हेंहि रशियाप्रमाणेच