पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३३)

नाताळ, आरेंज फ्री स्वेत्स व त्रान्सवाल येथें नव्या वसा- हती केल्या होत्या. ह्यांपैकीं नाताळ १८४४ त इंग्लि- शांनीं अजी खालसा केलें. आरेंज फ्री स्वेत्स १८४८त खालसा केलें होतें, परंतु १८५३ त परत दिलें. त्रान्सवाल १८७७त खालसा केलें होतें, व १८८१त परत दिलें.

 इंग्लिशांनी आपल्या वसाहती कोणत्या रीतीनें मिळविल्या, ह्याविषयींचा इतिहास ह्याप्रमाणें झाला. हा लिहित असतां घडलेल्या गोष्टींचें महत्त्व कमी करून दाखविण्याचा किंवा जेव्हां जेव्हां इंग्लिशांचें वर्तन दोपार्ह दिसलें, तेव्हां तेव्हां त्याच्यावर झांकण घाल- ह्या वेळापर्यंतच्या ण्याचा प्रयत्न केलेला नाहीं. परंतु हकीगतीचा सारांश. जसा खरोखर इतिहास घडला तसाच लिहिला आहे. आतां ह्या सर्व इतिहासाचा भावार्थ थोडक्यांत आणण्याचा प्रयत्न करूं. ह्यापैकी महत्त्वा च्या गोष्टी पुढे लिहिल्याप्रमाणे आहेत:---- (१ ) कित्येक शतकांपर्यंत जगांत महत्त्वाचा फेरफार असा होत होता कीं, लहान लहान राष्ट्र हळू हळू कमी होऊन मोठमोठीं राष्ट्र बनत चालली होती. ह्यामुळे राष्ट्रांच्या मोठेप - णाचा अजमास त्यांच्या युरोपांतील प्रदेशाच्या आकारा- वरून हल्लीं कोणी करीत नाहीं; तर सर्व पृथ्वीमध्यें त्यांच्या अमलांत जो प्रदेश असेल त्याच्या आकारावरून करितात. ब्रिटिश राज्य, युनायूतेद स्तेत्स व रशिया वगैरे विस्तीर्ण आकाराचीं राष्ट्रेंच पुढील काळीं महत्त्वाची बन-
१२