पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२९)

 ज्या युद्धांमुळे फ्रान्स देशामध्ये मोठी राज्यक्रांति झाली त्या युद्धांचा [ फ्रेंच रेव्होल्यूशनचा ] काळ यापुढे आला. ह्या युद्धांमुळे जे परिणाम घडले त्यांजबद्दलहि गैर समजूत होण्याचा संभव आहे. फ्रान्स देशांतील प्रजासत्ताक लोकांवर बर्क ह्याने कडक टीका केली अस पुष्कळ लोकांचें म्हणणें आहे; परंतु ह्या युद्धांपासून इंग्लि प्रजासत्ताक फ्रेंच राष्ट्राशी युद्ध केल्यामुळे मिळालेल्या वसाहती. शांस फायदे कोणकोणते झाले, इकडे मात्र त्यांचे अवश्य तितके लक्ष जात नाहीं. फ्रान्स, स्पेन व हालंद ह्या युरोपांतील तीन राष्ट्रांच्याच काय त्या पुष्कळ वसाहती होत्या; व ह्या युद्धामुळें ओळीनेंच ह्या तीन राष्ट्रांशी लढण्याचा इंग्लिशांना प्रसंग आला. ह्या युद्धासंबंधी विशेष महत्त्वा- ची गोष्ट कोणती? युद्ध सुरू होण्यापूर्वी इंग्लिशांच्या वसाहती त्यांच्या हातून गेल्या होत्या; परंतु युद्ध संपले तेव्हा वसाहतींचें एक नवें राज्य त्यांच्या ताब्यांत आले, व शिवाय एशिया खंडांतहि एक मोठा प्रदेश त्यांच्या ताब्यांत आला हीच महत्त्वाची गोष्ट होय.

 ह्या युद्धांतील लढायांचे दोन भाग कारतां येतील. + एमिन्स येथे १८०५ मध्ये॑ तह होऊन पहिल्या भागां- तील लढाया संपल्या; व त्यांमुळे २२,६०,००,००० पौंड कर्ज वाढलें. ह्या तहामुळे स्पेन देशांतील लोकां


 + एमिन्स हे ठिकाण फ्रान्समध्यें पारिसच्या उत्तरेस ७१ मैलांवर आहे. हा तह इंग्लंद, फ्रान्स, स्पेन व हालंद ह्यांमध्ये झाला.