पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२७)

होत्या. वरील युद्धांत इंग्लिशांस जो जय मिळाला, त्यामु ळें ह्या वसाहतींचा इंग्लंदाशीं जो संबंध होता त्याची चलबिचल झाली. त्याचप्रमाणे प्लारिदा घेतल्यामुळे स्पेन देशांतील वसाहतींच्या हल्ल्याचेंहि सर्व भय नाहींसें झालें. इतके झाले तरी त्यांचा व इंग्लंदाचा शिष्टाचारापु- रताहि संबंध कां राहूं नये, ह्याचें कारण दिसत नाही. तर हा संबंध अगढ़ींच नष्ट होण्याची कारणे काय? [ १ ] ब्रिटिश वसाहतींनी इतर वसाहतींशी व्यापार करूं नये, अशा नियमाची त्यांच्यावर इंग्लंदानें केलेली सक्ती; व [ २ ] ह्या वसाहतींवर कर बसविण्याचा पार्लमेंटास अधिकार आहे, अशाविषयीं तिसरा जार्ज व त्याच्या पक्षाची मंडळी यांनी धरिलेला हेका. ह्या वसाहती स्थापण्यास इंग्लंदास खर्च आला होता; ह्यास्तव त्याचा मोबदला कराच्या रूपाने वसाहतींनी देणे न्यायाचंच होतें; व ते लोक देण्यास कबूलहि होते. तथापि खुद्द इंग्लिश लोकांवर कर बसवितांना ज्याप्रमाणे त्यांचें मत घेण्यांत येतें त्याप्रमाणे, आपल्यावर कर बसवितांना आपलेंहि मत घेतले पाहिजे, असे त्या वसाहतींतील लोकांचें म्हणणं होर्ते. ब्रिटिश पार्लमेंट आपल्या संबंधानें मनास येईल त्याप्रमाणे कार- भार करितें, अशी त्यांची समजूत झाली होती; व ह्यामु- ळे त्यांनी पाहिजे तसे कर आपल्यावर बसवावे, ही गोष्ट मात्र त्यांना मान्य नव्हती. अमेरिकेतील इंग्लिशां- या वसाहती त्यांच्या हातून जाण्याची कारणे हींच