पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०२)

रिका, आस्त्रेलिया, वगैरे प्रदेशांचा ) आपणांस कांहींच उपयोग होणार नाहीं, आणि स्पेन व पोर्तुगाल ह्या राष्ट्रांनीं उदयास येण्याची जी संधी साधिली, ती आपण गमा- विल्याप्रमाणे होईल, असे इंग्लिश लोकांस वाटले. "" " *दूध सांडून गेल्यावर त्यासाठी रडत बसण्यांत कांहीं अर्थ नाहीं, " अर्से त्या काळच्या इंग्लिश लोकांस घरीं स्वस्थ बसून म्हणतां आलें असतें; अथवा अन्य रीतीनें आपलें समाधान करून घेतां आलें असतें; परंतु त्यांनी तसे कांहीं केलें नाहीं. त्या काळी स्पेन देशाशी त्यांचें फारसें सख्य नव्हते; म्हणून इंग्रजांच्या खलाशांनों जहाजें तयार केली, आणि स्पेन देशाच्या वसाहतींतून खजिन्याची गल- बतें भरून स्पेन देशास येत असतां, व्यापार करण्यास प्रतिबंध केल्यामुळे आपले जें नुकसान झालें होतें तें इंग्र- जांनी आपले आपणच भरून काढिलें! स्पेन देशच्या व्यापाराचें जें हें नुकसान झाले त्यामुळे तेथील राजा फिलिप ह्यास फार त्वेष आला; व पुढे लवकरच त्यानें स्पॅनिश आरमाडा' ( स्पेन देशची लढाऊ गलबतें ) म्हणून जें मोठें आरमार इंग्लंदावर पाठविलें, त्याचें मुख्य कारण हेंच होय.

 ह्या आरमाराचा पराभव झाल्यामुळे फिलिपाच्या


  • It was no use crying over spilt mi-

lk, ” ही मूळ इंग्रजी म्हण होय.गतं न शोच्यम् ' ही संस्कृत म्हण त्याच अर्थाची आहे.