पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०१)

पाऊल जस जसें पुढें पडणार, तस तसे ते एकमेकांपासून अधिकाधिकच अलग होत जाणार. म्हणून ह्या ठरावा- मुळे त्यांचें परस्परांमध्यें भांडण होण्याचा संभव नाहींसा झाला.

 पोपाचा हा ठराव जर इंग्लिशांनी मानिला असता तर नव्या जगांत ( अमेरिका खंडांत ) त्यांस पाऊल टाकण्यासहि जागा मिळाली नसती. परंतु त्यांनीं पोपाचा अधिकार लवकरच झुगारून दिला; म्हणून इंग्रजांच्या वसाहतीं- जे जे नवीन प्रदेश माहित होत चालले होते, त्या त्या प्रदेशांत जा- संबंधी राज्याचा प्रारंभ. ऊन व्यापारासंबंधानें आपला फायदा त्यांना करून घेतां आला. हा एक तत्कालीन *धर्मक्रांतीचाच परिणाम होय. ह्या नवीन वसाहतींना मूळच्या देशांशी ( ज्या ज्या देशांतील लोकांनी त्या स्थापिल्या असतील त्या देशांशीं ) मात्र व्यापार करूं द्यावयाचा, अशी युरोप खंडांतील सर्व राष्ट्रांची त्या वेळीं समजूत होती. तेव्हां आपण स्वतः जर वेळींच कांहीं हालचाल केली नाहीं, तर व्यापारासाठी नवीन उघडणान्या ह्या पेठांचा (अमे-


 * युरोप खंडांतील ख्रिस्ती देवालयांतून चालू असलेल्या धर्माचें स्वरूप बदलून त्यांत सुधारणा करण्याची सुरवात १६व्या शतकांत झाली; तीस “ रेफर्मेशन ” ( धर्मक्रांति ) म्हणतात. ही हकीगत ८व्या हेन्रीच्या कारकीर्दीत घडली; व या वेळेपासून पोपाची सत्ता फार कमी होत चालली.