पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/99

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६६ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास सेनेला. भारी असतो. या स्थितीत त्याच्या मार्गात येणा-या एखाद्या माणसाची त्याने कत्तल केली तर कायदा त्याला शासन करोत नाहीं. जेव्हाँ युद्धासाठीं सेना चालू लागते तेव्हा हे शूर शिपाई दंदुभीच्या सैन्याच्या आघाडीला चालतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा हा सम्राट आपल्या हत्तीखान्यांत हजारों हत्ती युद्धासाठी तयार ठेवतो. लढाईचा क्षण समीप आला कीं, या हत्तींना दारू पाजण्यांत येते; आणि मग मद्याने मत्त झालेले हे मातंग शत्रुसेनेवर प्रपाताप्रमाणे सोडले जातात. या स्थितीत जे जे म्हणून त्यांच्या पुढे येईल त्याचा ते चक्काचूर करून टाकतात... ‘‘सांप्रत सम्राट हर्ष पूर्व टोंकापासून पश्चिम टोकापर्यंत विजयी आहे. जामें दूरदूरच्या लोकांना वश केले आहे, शेजारच्या मुलुखाचे राजे त्याच्या शयाने कापतात. परंतु एक महाराष्ट्राचे लोक मात्र त्याला शरण गेलेले नाहींत. हर्षाने बाकीच्या सर्व भारतांतील सेनेचे सेनापतीत्व स्वीकारून अचेक वेळां या लोकांवर स्वारी केली आहे पण त्यांचा प्रतिकारभंग तो कवच करू शकला नाहीं.' अभ्यासः--१. लेखांक ३३ व ३४ वाचून पुलकेशीची पुढील मुद्यासंबंधी पहिती द्याः-(१)स्वभाव,(२)सैन्य, (३) आरमार, (४) पराक्रम, (५) योग्यता. ३५ । । । शंकराचार्यांच्या मते गीतेचे प्रयोजन [ बौद्धधर्माचा पाडाव झाल्यावर भरतखंडाच्या चारहि कोपन्यांत वैदिक धर्माची ध्वजा लावणारा पुरुष शंकराचार्य होय. मलबार प्रांतांत पूर्णा नदीच्या तीरावर कालटी ग्रामी एका नंबुद्री ब्राह्मणाच्या कुळांत त्यांचा जन्म झाला (शके ७१० वैशाख शु १०). त्यांना अवघे ३२ वर्षांचे आयुष्य लाभले. तेवढ्यात त्यांनी काशी येथील पंडितांशीं वोद करून त्यांना जिंकले. उपनिषदें, गीता व वेदान्तसूत्रे या प्रस्थान त्रयींवर भाष्य लिहिले, तेच सुप्रसिद्ध शांकरभाष्य होय. या भाष्यामुळे * जुन्या वैदिक संस्कृतीची परंपरा पुनरुज्जीवित होऊन तिचा भारतीय जीवनांतील धाया अखंड राहिला. शंकराचार्यानीं आठव्या शतकापर्यंत । अखंड अशी अहणून पोहोंचविलेली परंपरा तेराव्या शतकांत ज्ञाने श्वरांनी व विसाव्या शतकांत टिळकांनी महाराष्ट्रांत पुनरुज्जीवित