पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नालन्दा विद्यापीठाचे वैभव जे किंवा जेवढे देई ते त्याला कधीच पुरेसे वाटत नसे अगर पुरे होत नसे. म्हणून नालन्दा हा शब्द न + अलम् + दा ('न' म्हणजे नाहीं, ‘अलम्' म्हणजे 'पुरें' व 'दा' म्हणजे देणे,) यांचा मिळून बनला आहे. या व्युत्पत्तीबद्दल अधिक शोध केला पाहिजे.]

  • भारतांतील मठांची संख्या आजहि हजारोंनी मोजता येईल. परंतु विस्तार, भव्यता, उंची व श्रीमंती या बाबतींत येथील मठांची सर दुस-या कोणत्याहि मठाला येणार नाहीं. मठांत राहणा-या व बाहेरून येणा-या भिक्षुची संख्या नेहमी दहा हजारांपर्यंत असते; हे सर्व भिक्षु महायान पंथी आहेत. अठरा पंथांचे अनुयायी येथे एकत्रित झाले आहेत. येथे सामान्य ग्रंथापासून वेद व तत्सम अन्य ग्रंथ, त्याचप्रमाणे वैद्यकीय ग्रंथ व गणित शास्त्रापर्यंत अनेक विषयांचा अभ्यास होतो. मठांत शंभर व्यासपीठे आहेत व शिष्य आपल्या गुरूचे पाठ व प्रवचनें निष्ठेने श्रवण करतात व आपल्या आयुष्याचा एक क्षणहि ते वांया दवडीत नाहींत. | " या सुचरित लोकांचे जीवन स्वाभाविकच व्रती, संयमी व नियमनिष्ठ आहे. या गोष्टीचा एकच पुरावा म्हणजे या मठाच्या सातशे शतकांच्या दीर्घ आयुष्यांत एकहि शिस्तभंग करणारा भिक्षु येथे निघाला नाहीं. भारतातील सर्व लोक या मठांतील भिक्षूना मानतात व अनुसरतात. निरनिराळ्या धर्मविषयांवरील चर्चेला दिवस पुरा पडत नाहीं. प्रातःकालापासून सायंकालापर्यंत येथे धर्मचर्चेचा अखंड वाग्यज्ञ सुरू असतो. लहानथोर एकमेकांना मोकळ्या मनाने मदत करतात. जे त्रिपिटकांतील प्रश्नांवर चर्चा करू शकत नाहीत त्यांना येथे कमी लेखले जाते व लज्जेने ते आपले तोंड लपवितात. याच कारणासाठी वादविवादांत शीघ्र नांव मिळवू इच्छिणारे निरनिराळ्या देशांतील असंख्य विद्वान् या विद्यापीठांत येतात व आपल्या शंकांचे समाधान करून घेतल्यानंतर आपल्या पांडित्याच्या अनंतजलधारांनी भारताची बौद्धिक भूमि समृद्ध करतात. या देशांत. या मठांची कीति इतकी पसरलेली आहे व तो इतकी मान्यता पावला आहे कों, पुष्कळ लोक आपण नालन्दाचे विद्यार्थी आहोत असा बहाणा करून ते जनतेपासून मान मिळवितात.

“येथील राजाच्या मनांत या मठाबद्दल अत्यादर असून तो त्यांतील भिक्षंना मोठ्या बहुमानाने वागवितो. मठांतील भिक्षूच्या योगक्षेमासाठी त्याने शंभर गांवांचे उत्पन्न बाजूला काढून ठेविले आहे. प्रतिदिनी दोनों