पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/93

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६० हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास निघाला. वाटेत सरकारी नाकीं चुकविण्यासाठी अधिक आडवळणाची वाट त्यास शोधावी लागली. कांहीं कांहीं वेळेस तर अन्नपाणी न मिळाल्यामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे प्रवासांतच त्याचा शेवट होण्याचा काळ प्राप्त झाला होता. अथांग अशा मरूभूमींतून प्रवास करीत असतां त्याच्या स्वतःच्या सावलीशिवाय या यात्रेकरूला अन्य कोणीहि वाटाड्या नव्हता. पण बुद्धाच्या आशीर्वादानें तो आपल्या अगीकृत कार्यात यशस्वी झाला. भारतवर्षात त्याचे चांगले स्वागत झाले. तत्कालीन सम्राट हर्ष व पुलकेशी यांनी त्याची योग्यता ओळखून त्याचा मोठा आदरसत्कार केला. हर्षाच्या राजसभेत व त्याच्या राज्यांतच ह्युएन-त्संगाने अनेक वर्षे घालविली. सुप्रसिद्ध नालन्दा विद्यापीठांत तो दोन वर्षे मुख्यतः विज्ञानवादाच्या अध्ययनासाठी राहिला होता. । भारतवर्षांत १५ वर्षे त्याने यात्रा केली. महाराष्ट्रांतहि तो येऊन गेला. या संचारांत त्याने राजकीय, सामाजिक, धार्मिक, माहिती गोळा केली. त्याच्या आधारे स्वदेशांत परतल्यावर त्याने ‘पश्चिमदेशकथा' नांवाचा ग्रंथ लिहिला, त्याचे १२ भाग आहेत. बँटर्सनने या ग्रंथाचा इंग्रजीत अनुवाद केला. । मराठीमध्ये हि, ‘भगवान् बुद्धासाठी नांवाचे पुस्तक श्री. शंकरराव देवांनी लिहिले आहे. त्यांत त्यांनी फा-हैन, युएन-त्संग आणि इतर अनेक भिक्षु हे भगवान् बुद्धाच्या प्रेमामुळे या देशांत कसे आले याचे चांगले वर्णन दिले आहे. तत्कालीन समाजस्थिति कळण्यास या पुस्तकाचा उपयोग होतो. याच पुस्तकांतील पृ. १३२-३३ वरील उतारा पुढे दिला आहे. तो मुळांत ह्युएन-त्संगानेच लिहिलेला आहे. ‘नालन्दा' नांवासंबंधी पुढीलप्रमाणे माहती या पुस्तकांत श्री. देवांनीं दिली आहे. “बुद्धगयेच्या वायव्येला नालंदा नगरी होती. ही खरोखरी मठनगरी होती. येथे पूर्वी एक आंवळीवन होते; त्यांतील तळयांत राहणा-या नागाचे नांव नालन्दा असे होते म्हणून या शहराला नालन्दा " असे नांव पडले अशी आख्यायिका आहे. परंतु सत्यकथा अशी आहे की, तथागत (गौतम बुद्ध) पुर्वकाळी या प्रदेशांत बोधिसत्त्वाचे जीवन घालवीत असतांना या भागांतील एका मोठ्या राज्याचा अधिपति बनला व त्याने आपली राजधानी या जागेवर स्थापन केली. भूतमात्रासंबंधीं दयेने प्रेरित होऊन तो त्यांना नेहमीं साहाय्य करी. तो