Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नालन्दा विद्यापीठाचे वैभवं ५९ घेतल्यावर देवी राज्यश्री कैदेतून सुटून परिवारासह विन्ध्य पर्वताच्य अरण्यांत गेली, अशी लोकांकडून वातमी ऐकली. तिच्या शोधासाठी पुष्कळसे लोक पाठविले असून अद्याप कोणीच परत आले नाहींत. हे ऐकून राजा (हर्ष) म्हणाला ‘‘दुसरे लोक पाठविण्यापासून काय उपयोग ? ज्या ठिकाणी ती (राज्यश्री) असेल तिकडे बाकी सर्व कामे टाकून मी स्वतःच जाईन. आपणहि थोडे सैन्य घेऊन गौड देशाच्या रोखाने निघावे." .... दुसरे दिवशी पहाटेच भण्डी राजाजवळ जाऊन म्हणाला, 'महाराज, राज्यवर्धनाने आपल्या बाहुबलाने मिळविलेले (जिकलेले), राजभोग्य वस्तूंसह असलेले मालव देशाच्या राजाचे सैन्य आपण पहावे.' ‘तसे करा. (ठीक आहे ) असे राजाने सांगितल्यावर (समृद्ध सामग्नीने युक्त असे ) ते सैन्य राजास दाखविण्यात आले. राजाने त्याची पाहणी करून योग्य त्या अधिका-यांना सर्व वस्तूंचा स्वीकार करण्याचा अदेश दिला. दुसरे दिवशीं घोड्यावर बसून बहिणीच्या शोधार्थ तो निघाला व मुक्काम करीत करीत विध्याटवीमध्ये पोहोचला. [कथासंदर्भ : विध्याटवीमध्ये दिवाकर मित्र नांवाच्या बौद्ध भिक्षुची व हर्षाची गांठ पडली. कोणी एक स्त्री अग्निप्रवेश करण्याच्या बेतांत आहे अशी बातमी त्याने तेथे ऐकली. लगेच ती आपली बहीणच असावी असे मनांत येऊन हर्ष भिक्षुसह तिकडे निघाला. विलापाचे आवाज ऐकून ते त्या रोखे जातात तोंच अग्नीत प्रवेश करण्याच्या बेतांत असलेली राज्यश्री त्यांना आढळली. ] अभ्यास :--१. बाणभट्टाची माहिती सांगा. २. हर्ष स्वतःच बहिणीच्या शोधार्थ कां निघाला ? ३. वरील वृत्तांतांत ज्या राजांचों व गांवांची नांवें आली आहेत त्यांची यादी करा. ३१ । । । नालन्दा विद्यापीठाचे वैभव [हयएन-त्संग हा एक चिनी विद्वान् होय. इ.स. ६३० त हा आपल्या देशांत बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी आला. तत्कालीन चिनी राजाकडून त्यास स्वदेश सोडण्यास परवानगी मिळाली नव्हती, परंतु निराश न होतां धर्मजिज्ञासेमुळे तो तिबेटमार्गे भारतवर्षात येण्यास