पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/9

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२)

साधने दुर्मिळ असतांनाहि दिव्यदृष्टीने जे पाहिले व मराठ्यांच्या इतिहासाचा आराखडा मांडला त्यांतच रंग भरण्याचे काम त्यांचे लहान मोठे अनुचर आपापल्या कुंचल्यांनी पुढील पिढीत करीत आहेत. आतां साधने उपलब्ध होत असल्याने त्यांचा उपयोग करून रानडे-राजवाडे यांच्याहिपेक्षां उंचीवर गरुड-झेप घेऊन उड्डाण करणारा व तेथून आपल्या प्रतिभेचे विशाल पंख पसरणारा असा इतिहासकार स्वातंत्र्यकालांत महाराष्ट्रास पुढेमागे लाभेलहि. सांगण्याचा मुद्दा एवढाच की, ऐतिहासिक विपुल साधने व उच्च कल्पनाशक्ति या दोहोंच्या बळावरच खरोखर उत्कृष्ट इतिहासलेखन होऊ शकेल. इतिहासाच्या अध्ययनास साधनें परीक्षून नेमके विधान करण्याची विचक्षणा व ऐतिहासिक बनावाचा साकल्याने अभ्यास करून समाजपुरुषाच्या प्रकृतीचे निदान करण्याचे सामर्थ्य ही दोन्हीहि अत्यावश्यक आहेत. पहिले काम शास्त्रदृष्टीचे आहे व दुसरे दिव्य प्रतिभाशक्तीचे आहे. प्रस्तुत पुस्तकानें सामान्य वाचकांचा व विद्यार्थाचा शास्त्रदृष्टीशी थोडा परिचय होईल असा भरंवसा वाटतो.

शाळांतून इतिहास शिकवितांना मूळ ऐतिहासिक साधनांचा कसा उपयोग होतो यासंबंधीचे विवेचन श्री. चितळे यांनी अन्यत्र* केले असल्याने त्याची येथे द्विरुक्ति नको. परंतु या पद्धतीस उपयुक्त अशा ( Sourcebooks ) साधन-पुस्तकाची उणीव त्यांच्या लक्षात आल्याने तेव्हांपासून (१९४१) ती कांहोंशी दूर करण्यासाठी प्रस्तुतसारखे उतारे संग्रहित करण्याचे व वर्गात त्या आधारे शिकविण्याचे काम त्यांनी सुरू केले. यासंबंधी एकाच विषयाचे अभ्यासक आणि स्नेहसंबंधी म्हणून श्री. ओतुरकरांची व त्यांची चर्चा होत असे. श्री. ओतुरकरांनीहि मराठ्यांचे साम्राज्य, मुसलमानांचे साम्राज्य या पुस्तकांतून असे उतारे देण्याचा यत्न यापूर्वीच केला आहे; पण तेवढ्याने विद्यार्थ्यांच्या वा वाचकांच्या मनांत साधनांचे महत्त्व ठसत नाहीं व साधनतंत्राशी त्यांचा परिचय होत नाहीं. हे लक्षात घेऊन प्रस्तुत सारखा ग्रंथ प्रसिद्ध करण्याचे उभयतांनी ठरविलें तें आज पूर्ण होत आहे.

शिक्षणाचे साधन म्हणूनच केवळ नव्हे तर इतिहासाचे यथार्थ आकलनहि मूळ साधनांच्या अभावी होऊ शकणार नाही हे लक्षांत
इतिहास कसा शिकवावा-प्रकरण ६, पृ. ४२-५२