पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

l ५२ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास ओळ पंधरावी सर्व सुकृत श्रमणांच्याकरितां, सुविहित असलेले शास्त्रदृष्टीचे जाते आणि तपऋषि अशांकरतां संघायतन निर्माण केले. ओळ सोळावी* आणि मुरिय काल उलटल्यावर तो सटीक ६४ अंगे करविता झाला ओळ सतरावी । विशेष गुणांमध्ये पारंगत होत्साता सर्व पंथांना मान देणारा, सर्व देवायतनांना सुशोभित करणारा, ज्याचे रथचक्र अप्रतिहत आहे असा, आपल्या प्रवृतचक्र (वाढलेल्या) राज्याचा पुढारी (चक्रधरु) आणि राज्याचे संरक्षण करणारा ( गुप्तचक्र ) जो राजविंश कुलामधून उत्पन्न झाला आहे असा महाविजय श्रीखारवेल (होय). अभ्यास:--श्रीखारवेलाचे समकालीन राजे कोणते असावे? खारवेलाचे कांहीं पराक्रम सांगा. २८.: : : अजंठ्याची लेणी [ वेरूळ येथे डोंगरांत लेणी कोरलेली आहेत. ही लेणी म्हणजे जणू प्रचंड घरे व देवळे आहेत. अजंठा येथील लेण्यांमध्ये कोरलेल्या भितींवर अत्युत्तम रंगीत चित्रे काढलेली आहेत. ही चित्रे एकाच वेळी काढलेली नाहींत; ख्रिस्तपूर्व तीनशे वर्षांपासून ख्रिस्त शकाच्या सहाव्या शतकापर्यंत ती कोरली गेली आहेत. अशोक, गुप्त व हर्षवर्धन हे महान् राजे या काळांत होऊन गेले. इतक्या वर्षांनंतरहि ‘टिकलेले रंग', 'बाह्य रेषेचे सौंदर्य', 'भावनिदर्शनाची हातोटी' यांमुळे या चित्रांनों जगास मोहिले आहे. गौतम बुद्धाच्या पूर्वजन्मांच्या ज्या कथा जातकांत अहेत त्या गोष्टींचे चित्रण अनेक चित्रांतून केलेले आहे. या चित्रावरून या हजार वर्षांत लोक कसे वागत, घरे कशों बधीत, लग्नसंस्कार कोणत्या रीतीने करीत, त्यांच्या गाड्या, रग्य कसले असत, ते शस्त्रे कोणती वापरीत, वस्त्रे कोणती परिधान करीत याची काहीशी माहिती मिळते. अजंठ्याच्या चित्रासंबधी सटीक व सचित्र माहिती श्रीमंत बाळासाहेव पंतप्रतिनिधि यांनी लिहिलेल्या 'अजंठा' या पुस्तकांत ‘जिज्ञासू' ना पाहावयास मिळेल. ]

  • “मुरीयकालाची १६४ वर्षे उलटल्यानंतर' असहि अर्थ या ओळीचा लावण्यांत येतो. * अंग = जैनांचे तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ.