पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/83

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५० हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास अभ्यास :--दुस-या चंद्रगुप्ताच्या काळच्या शिक्षा, लोकांचे खाणेपिणे, राजाचे कर यासंबंधींची माहिती थोडक्यांत लिहा. ३७ : कलिंग देशाचा राजा पराक्रमी श्रीखारवेल [कलिंगाचा राजा श्री खारवेल याच्या कारकीर्दीची माहिती देणारा भुवनेश्वरजवळील हाथी गुंफेतील हा लेख होय. मगधावरील शृंग राजाचा पराभव या श्रीखारवेलाने केला, असा उल्लेख या शिलालेखांत आहे. या डोंगरावर १६५मौर्यशकांत हा लेख कोरविला असा एका ओळीचा अर्थ कांहीं संशोधक करितात. डॉ. श्री. व्यं. केतकरांच्या मतेहि खारवेल-लेखकाल खि. पू. १७० धरण्यास हरकत नाहीं. ते लिहितात ‘खारवेलचा हा लेख भारतीय इतिहासांतील अत्यंत महत्त्वाच्या लेखांपैकीं समजला जातो. जैन संप्रदायाच्या इतिहासांत याला महत्त्व आहे. शातकर्णीच्या इतिहासांत हा महत्त्वाचा आहे.'••••••'नंदकालीन गोष्टींच्या उत्तरकालीन आठवणी गोळा करितांना खारवेलाचा पुरावा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. मूळ लेखाच्या डॉ. केतकरकृत अनुवादांतून (प्राचीन महाराष्ट्र, पृष्ठ ४१६ ते ४१८.) पुढील अवतरणें दिली आहेत. या लेखाचा जयस्वालकृत इंग्रजी अनुवाद Journal of :: the Bihar and Orissa Research SocietyVol. III Pt. 4 मध्ये पहावा.] ओळ पहिली - अर्हतांना नमस्कार असो. सर्व सिद्धांना नमस्कार असो. ज्यावर प्रशस्त अशीं शुभ लक्षणे आहेत, जो चान्ही दिशांकडे पसरलेल्या आपल्या राज्याचा जणू काय आधारदाता स्थाणेच आहे, जो चेदिराजाच्या वंशाची वृद्धि करणारा आहे अशा या आर्य महाराज कालिगाधिपति श्रीक्षारवेल महामेघवाहनाने ओळ दुसरी । १. पंधरा वर्षे, सुंदर आणि गवताप्रमाणे कोवळ्या अशा याने कुमारक्रीडा केल्या, आणि नंतर लेखनशास्त्र, रूप (?)* गणनाशास्त्र, व्यवहारशास्त्र, विधिशास्त्र इत्यादि शास्त्रांत विशारद होऊन सर्व विद्यांनी भूषित होत्साता नऊ वर्षे

  • नाण्याचे शास्त्र (जयस्वाल)