पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना हिंदुस्थानच्या प्रदीर्घ म्हणजे प्राचीन कालापासून आतांपर्यंतच्या इतिहासाच्या साधनांचा कांहींसा परिचय मराठींतून करून देणारे हे पहिलेच पुस्तक आहे. इतिहासाचे सामान्य वाचक कधी कधीं युवानचांग, कल्हण, एपिग्राफिका इंडिका, बराणी, बनियर, मनूची, फेरिस्ता, जेधे शकावली, सभासद बखर, कान्येतिहाससंग्रह, कीथ, रेम्से म्यूर, इल्बर्ट असल्या अपरिचित व्यक्ती व ग्रंथनामें वाचतात व नंतर बहुधा विसरून जातात. अशांपैकीं कांहीं निवडक व्यक्तींचा व साधनांचा परिचय करून देणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. माजघरांत काढून ठेवलेल्या साहित्याचे स्वयंपाक घरांत रुचकर असे मिष्टान्न तयार होते, तसा साधन ग्रंथांतून इतिहास तयार होतो. पदार्थ निवडून, पाडून, दळून, कांडून, धुऊन घ्यावे लागतात तेव्हां पाकपदार्थास रुचि येते हे खरे. पण उपलब्ध वरतूंच्या अंगभूत गुणांवरच सुगरणीची सारी करामत अवलंबून असते. तसे इतिहास लेखनांत मूळ साधनांच्या आधारावरच इतिहासाचा आराखडा तयार करता येतो. याचा अर्थ असा नाहीं कीं, अस्सल साधनांच्या अल्प आधारावर प्रतिभासंपन्न लेखकास इतिहासाचे दिव्य दर्शन दाखवितां येणारच नाहीं. । कवि देवांचे रूपकते ।। कवि ऋषींचे महत्त्व वणते ।। असे समर्थांनी कवींसंबंधी म्हटले आहे ते प्रतिभासंपन्न इतिहासकारासंबंधींहि खरे आहे. रानड्यांचे ‘राईज ऑफ दि मराठा पॉवर' वाचणारास किंवा राजवाड्यांची ‘पानिपत खंडाची' प्रस्तावना वाचणारास तरी हा संशय उरणार नाही. किंबहुना अर्धशतकापूर्वी रानडे, राजवाडे प्रभृतींनीं