४६ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास (३९) आधीच विनीत असलेल्या राजाने त्या लोकांपासून पुनरपि विनय शिकावे. कारण विनयशील अशा राजाचा विनाश केव्हांहि होत नाहीं (विनय = संपूर्ण लोकाचार नि शास्त्राचार.) अभ्यास :-उतारा क्र. ७, १७ व २४ (प्रस्तुतचा) वाचून'राजाची कर्तव्ये यावर निबंध लिहा. त्यांत मोगल किंवा मराठे राजे यांच्यासंबंधी उदाहरणे द्या. २५ । । सम्राट् समुद्रगुप्ताचा पराक्रम [हा गुप्तकालीन शिलास्तंभ सध्यां अलाहाबाद येथील किल्ल्यांत ठेविलेला आहे. या शहरापासून २८ मैल अंतरावर असणा-या कोसल (प्राचीन कौशाम्बी) येथे तो प्राचीन काळीं उभारलेला असावा. कारण कौशाम्बीच्या प्रांत चिंका-याना उद्देशून कांहीं मजकूर या स्तंभावर अशोकानें खोदविलेला आहे. पुढे दिलेला लेख याच स्तंभावर कोरलेला आहे. हा महत्त्वाचा लेख प्रथम इ.स. १८३४ मध्ये (I. A. S. B. Vol. III p. 118 ff मध्ये) प्रसिद्ध करण्यांत आला. प्रस्तुत लेखांत समुद्रगुप्ताच्या विजयाचे वर्णन आहे. साहजिकच त्यांत भारतवर्षातील देशविभाग, राजे आणि लोकसमूह (इ. स. ४ थ्या। शतकांतील) यांचे उल्लेख आहेत. या प्रांताची आजचीं अंदाजी नांवें टीपेत दिली आहेत. या लेखाचा काल समुद्रगुप्ताचा दिग्विजय संपून अश्वमेधयज्ञ होण्यापूर्वीचा म्हणजे अंदाजे इ. स. ३५० असावा असे आंतील वर्णनावरून अनुमान करावे लागते. प्रत्यक्ष कालनिर्देश त्यांत नाहीं. प्रारंभींचा थोडासा भाग अस्पष्ट झाल्याने वाचतां अलेला नाहीं. समुद्रगुप्ताच्या राजसभेतील संधिविग्रहिक, कुमारामात्य आणि महादंडनायक अशा मंत्रिपदावर असलेल्या हरिषेण नांवाच्या अधिका-याने संस्कृतांत हा लेख रचलेला आहे. गद्यपद्यमय ७५ ओळी खोदलेल्या आहेत. संस्कृत भाषेतील काव्य या दृष्टीनेंहि हे लेखन चांगले साधलेले अाहे.श्री.द.ब.डिसकळकर एम्.ए. यांनी संपादिलेल्या सिलेक्शन्स फ्रॉम संस्कृत अिन्स्क्रिप्शन्स् { १९२५) मधील क्र. ३ च्या आधारे पुढील भाषांतर केलेले आहे. काव्य प्रकारापैकी प्रस्तुतचा लेख हा चंपूकाव्य (गद्यपद्यमिश्र रचना) आहे. त्यांत प्रारभीचे आठ श्लोक, त्यानंतर येणारा दीर्घ परिच्छेद आणि शेवटचा श्लोक, हे सर्व भलें लांबलचक वाक्य आहे. . या वाक्यांत अनेक विशेषणवाक्ये आहेत. ज्याने (यः) ' असे केले त्या
पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/79
Appearance