पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/78

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मनूने सांगितलेली राजाची कर्तव्ये ४५. ३४ : : मनूने सांगितलेली राजची कर्तव्ये. [मनुस्मृति ही मुळांत भृगू ऋषींनी लिहिलेली असून तीत मागाहुन पृष्कळ भर पडल्यासारखी वाटते. मूळ मनुस्मृतीचा रचनाकाल इ. पूर्व २०० असावा. या ग्रंथाला आजचे स्वरूप इ. स. च्या दुस-या शतकांत प्रप्त झाले असे वेबरचे मत आहे. बौद्धधर्माच्या प्रसारामुळे वर्णाचा उच्चनीच भाव व रक्ताची शुद्धाशुद्धता याचे महत्त्व नाहीसे झाले, त्याचे पुनरुज्जीवन व्हावे असा मनुस्मृतीचा प्रयत्न दिसतो. समजतील निरनिराळया वर्गाची कर्तव्ये या ग्रंथांत विशद करून सांगितली अ हेत. ७व्या अध्य य त 'राजधर्मान् प्रवक्ष्य मि' असे म्हणून ‘राजाची कर्तव्ये सांगितली आहेत. त्यातील ३२ ते ३९ श्लोकाचा. अनुव द पुढे दिलेला आहे. मनुस्मृति' ( सपादक प्राणजीवन शर्मा, आवृत्ति १९१३, पृ. २४०-२४१ च्या आधारें. ] (३२) स्वतःच्या राष्ट्रांत न्यायानुकूल वर्तन करणारा, शत्रु लोकांना अत्यंत कडक शासन करणारा, सुहृज्जनाविषयीं केव्हांहि कुटिल वर्तन न करणारा नि स्निग्ध (स्नेहशील) ब्राह्मणांना क्षमा करणारा असा तो नृपति असावा. | (३३) वरीलप्रमाणे वर्तन ठेवणा-या, अत्यत कमी प्रमाण त कोश ( सम्पत्ति) असलेल्या नृपतीचीहि कति पाण्यात टाकलेल्या तेलाच्या थेंबाप्रमाणे जगांत विस्तार पावते. | (३४) आपापल्या परीने आपापल्या धर्माची आचरणे करणा-या सर्व वर्णाचा नि आश्रमाचा (म्हणजे त्या त्या वर्षांतील नि आश्रमांतील लोकांचा ) राजा हा अभिरक्षिता म्हणजे संरक्षण करणारा म्हणून नेमण्यात आला आहे (३६) प्रजाजनांचे रक्षण करणा-या त्या राजानें भृत्यजनांसकट जे कांहीं ‘कर्तव्य' म्हणून करावयाचे ते क्रमाने मी येथे तुम्हांस सांगणार आहे. | (३७) सकाळी उठल्यावर तिन्ही वेदांत प्रवीण, विद्वान् अशा ब्राह्मणांच्या सान्निध राजाने जावे, त्यांचा सल्ला घ्यावा, नि ते जे कांहीं कर म्हणुन सांगतील ते त्याप्रमाणे करावें. (३८) वेदज्ञानांत पारंगत, बयाने वृद्ध नि आचरणाने पवित्र अशा वांच्या सान्निध्यात सदैव राहावे. याप्रमाणे वृद्ध जनांच्या सान्निध्यांत (नि त्यांच्या शासनांत) राहणा-या (राजा ) ची पूजा राक्षस लोक (म्हणजे प्रति पक्षी लोक) देखील सदोदित करीत असतात.