पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४४ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास दुसन्यास सांगू नका." राजाने उत्तर दिले, * प्रधानजी तुमचे म्हणणे मान्य आहे. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी वागेन.' कांही दिवसांनी त्या मंत्र्याने कुगल सेनापतींना बोलाविले व त्यांना चतुरंग सेना दिली. त्यामुळे, जिकडे जिकडे राजा स्वारी करो तिकडे तिकडे लोक त्यांस नमस्कार करू लागले. गारांच्या वर्षावापुढे ज्याप्रमाणे वनस्पति वांकतात, त्याप्रमाणे तीनहि प्रांतांतील लोक त्याच्यापुढे नमून वागू लागले कनिष्काच्या घोड्यांच्या टोपेख लीं जे येई ते वाकें किंवा मोडे. अशा स्थित त राजा ( कांहीं जणांजवळ ) म्हणाल: : * मीं तीन प्रांत जिंकले, सगळे जण माझ्या आश्रयाला येत आहेत. परंतु उत्तरेकडील प्रांत तेवढा अद्याप माझ्या पकडींत आलेला नाहीं. तो प्रांत मी जिंकला म्हणजे मग मी लढाई बंद करीन, अगदीं सधि आली तरी मी कोणावरहि हल्ला करणार नाहीं. या कामी यश येण्याचा अचूक मार्ग अजून मला सांपडला नाहीं. | राजाचे हे बोलणे लोकांना कळले, तेव्हां ते एकत्र जमले व विचारविनिमय करू लागले. ते म्हणू लागले, “ हा राजा घाशी, क्रूर आणि अविवेकी आहे. त्याच्या वा-या आणि सतत चाललेले विजय यामुळे त्याचे सेवकह थकलेले आहेत. तरीसुद्धा त्याला समाधान नाहीं तें नाहींच. चारहि दिशांवर अंमल गाजविण्याची आकांक्षा त्याच्यांत उत्पन्न झाली आहे. आजच त्याच्या राज्याच्या दूर दूर से मेवर सैनिकी तळ आहेत, आणि यामुळे आमचे नातलग आमच्यापासून फार दूर गेले आहेत. आपण काहीं तरी करून था राजाच्या तावडीतून सुटका करून घेतली पाहिजे. असे केले तरच आपणांस से मिळेल." | यानंतर कांही दिवसांनीं राजा कनिष्क आजारी पडला असतां कटवाल्यांनों -याच्या अंगावर पांघरूण घातलें व एक जण त्याच्या छातीवर बसला. त्याच क्षणीं राजा मरण पावला. 1. अभ्यास :-१.दंतकथा म्हणजे काय ? प्रस्तुत दंतकथेत सत्य काय असावे याचा अंदाज करा. २. अशा कांहीं दंतकथा संग्रहीत करा.