पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४३ कनिष्काने मरण ओढवून घेतले ६ । १८ लाभ करणम् ।---वि।--- ७ अर्थ-विक्रीच्या दराने खरेदीच्या दरास भागा. एक उणे करा. त्याने पुनः एकास भागा, त्यास नफ्याने गुणा म्हणजे खरेदींत गुंतविलेले भांडवल मिळेल. भांडवल = X नफा * खरेदीच। दर विक्रीचा दर । उदाहरणः एक जण २ ला ७ आणतो, आणि ३ ला ६ विकतो. तर १८ हा नफा असेल तर भांडवल काढा. २३ । । कनिष्काने मरण ओढवून घेतलें! [कुशान टोळ्यांपैकी कनिष्क हा पराक्रमी राजा होय. हा राजपदावर नक्की केव्हां आला या घटनेबद्दल संशोधकांत एकमत नाही. हा काल ख्रि. १-५७-५८ ते स्वि.नतर ७८ पर्यंतचा आहे. कांहींच्या मते त्याचा काल इ. स. च्या तिस-या शतकापर्यंत पुढे जातो. कनिष्काची राजधानी पुरुषपूर (पेशावर) होती. प्रारंभींचे राज्य म्हणजे प्राचीन गांधार देश. पुढे पाटलिपुत्रापर्यंत त्याचे राज्य पसरले. पश्चिम सीमेवर पशियन व रोमन साम्राज्याचा प्रदेश असून पूर्वेस चिनी साम्राज्य होते. त्याने चौथी बुद्धधर्मपरिष्द श्रीनगर येथे भरविली. तो महायान पंथाचा पुरस्कर्ता होता. महाकवि अश्वघोष व आयुर्वेदाचा आचार्य चरक हे प्रसिद्ध विद्वान् कनिष्काच्या राजसभेत होते. | डॉ. सिल्व्हन लेव्ही यांनी कनिष्काच्या मृत्यूची दंतकथा प्रकाशित केली आहे. तिचे रूपांतर पुढे दिले आहे. मूळ कथा श्रीधर्मपीटिके- : मध्ये आहे. ] कनिष्काच्या पदरीं माथर नांवाचा प्रधान होता. तो मोठा कल्पक वे चतुर होता. एक दिवस तो कनिष्काला म्हणाला, " महाराज, तुम्ही जर या चाकराच्या सल्ल्याप्रमाणे वागाल तर सर्व जगाचे तुम्ही धनी व्हाल. तुम्हांस सगळे शरण येतील आणि आटहि प्रांत तुमच्या गुणावर लुब्ध होतील. दासाच्या या शब्दांवर विचार करा, मात्र यातील एकहि शब्द