पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास १८... अशोकाच्या चौदा आज्ञा [अशोक हा मगधावर राज्य स्थापणा-या चंद्रगुप्त मौयाचा नातू होय. तो राज्यावर आला तेव्हांच उत्तर हिंदुस्थान व दक्षिण हिंदुस्थानांतील पुष्कळ भाग मौयांच्या सत्तेखाली आलेला होता. कलिंग देश अशोकाने जिंकला. अशोकाच्या कारकीर्दीचा काल लि. पू. २७३ ते २३७ आहे. प्रजेत स्नेहभाव वाढावा, दया आणि अहिंसा यांचा प्रचार व्हावा म्हणून त्याने आपल्या चौदा आज्ञा, जागोजाग, सोप्या भाषेत कोरून ठविल्या आहेत. त्याच्या शिलालेख चे गिरिलेख, स्तंभलेख व गुहालेख असे तीन भाग करता येतील. ह्या लेखांतून त्याने सामान्य लोकांस ज्ञा व अधिका-यांस सूचना केलेल्या आहेत. बहुतेक लेखांतून एखाद्या विशिष्ट धर्मपथाचा उपदश करण्याऐवजीं मानव धर्माच्या सामान्य नीतितत्त्वांचा पुरस्कार केलेला आहे. । त्याचे लेख देशाच्या चारी भागांत आढळतात. पेशावरजवळ शहावादगड येथे, ठाणे जिल्ह्यांत सोपारा गांवीं, काठेवाडमध्ये गिरनार या ठिकाणीं, ओरिसा प्रांतांत जगन्नाथपुरीनजीक धौली या गांवीं व दक्षिणेस गजम जिल्ह्यांत जावगड येथे या आज्ञा पाहावयास सांपडतात. - गिरनारच्या लेखांचा (चौदाहि अज्ञांचा) अनुवाद डॉ. श्री. व्यं. केतकर यांनी मराठीत केला आहे त्यांतील १२ व १३ व्या शासनांचा व धौलीच्या लेखाचा अनुवाद येथे दिला आहे. (यांतील कांहीं इलोकांचा अर्थ स्पष्टपणे लागत नाहीं). प्राचीन महाराष्ट्र, पृ. ३५०-३५३ व पृ. ३६५-३६७ ] (क) राजा देवप्रिय प्रियदर्शी सर्व संप्रदायांना मान देतो. संन्याशी आणि गृहस्थाश्रमी ह्या दोघांनाहि मान देतो. तो राजा दान व नाना त-हेने पूजा व सत्कार करून मान देतो. । (ख) परंतु हा देवप्रिय राजा दान किंवा सत्कार यांना सर्व संप्रयांची सारवृद्धी (तत्त्वांची जोपासना) इतके महत्त्व देत नाहीं. । (ग) परंतु सर्व संप्रदायांची सारवृद्धि पुष्कळ मार्गानी होऊ शकेल. (घ) परंतु त्याचे मूल म्हणजे आपल्या स्वत:च्या वाचेवर नियंत्रण (वंचिगुंत) म्हणजे संप्रदायाची स्तुति न करणे, परसंप्रदायाची अवास्तव