Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मौर्यकालीन राजाची दिनचर्या ३३ हालहवाल व जमाखर्च ऐकावा. दुस-या भागांत नागरिकांच्या तक्रारी ऐकाव्या. तिस-या भागांत र नान व भोजन करावे व अभ्यास करावा. चवथ्या . विभागांत वसुलीचा स्वीकार करावा व निरनिराळ्या खात्यांतील अध्यक्षांच्या भेटी घ्याव्या. ६चव्या भागांत पत्र पाठवून मंत्रिपरिषदेची सल्लामसलत घ्यावी व गुप्त हेांनी आणलेल्या महत्वाच्या बातम्या ऐकाव्या. सहाव्या विभागांत स्वच्छंद विहार करावा किंवा मसलत करावी. सातव्या विभागांत हत्ती, घोड, रथ व योद्धे यांची पाहणी करावी. आठव्या विभागांत सेनापतीबरोबर बुद्धचर्चा करावी. संध्याकाळ झाल्याबरोबर संध्या करावी....रात्रीच्या पहिल्या भागांत गुप्त हेरांची भेट घ्यावी. (तिस-या, चवथ्या, पांचव्या-सहाव्यामध्ये गीत-वाछ श्रवण, शयन, शारत्रचितन व) सातव्या भागांत मसलत करावी व गुप्तहेरांना कामें सांगून त्यांची रवानगी करावी. आठव्या भागांत ऋत्विज, आचार्य, पुरोहित यांचेकडून स्वस्तिवाचन करून घ्यावे; नंतर राज वैद्य, बल्लवाधिकारी, ज्योतिषी यांची भेट घ्यावी, सबत्स धेनूला व दैलाला प्रदक्षिणा करून दरबारला जावे, किंवा आपल्या शक्तीप्रमाणे अहोरात्राचे कमजास्त भाई करून त्याप्रमाणे कार्य करावे. दरबार’त गेल्यावर अर्जदारांना आंत येण्यास मोकळीक द्यावी राजाने देवस्थाने, अ.श्रम, पुण्यस्थाने, रोगी, व्यसनी यांची कामें ...पाहावीत. उद्योग, यज्ञ, न्यायदान, द्रव्यदान, नि:पक्षपाती आचरण व यज्ञति अवभृतस्नान हीं राजाचीं व्रते आहेत. प्रजासुखे सुखं राज्ञः प्रजानां च हिते हितम्। | नात्मप्रियं हितं राज्ञः प्रजानां तु प्रियं हितम् ।। | ( प्रजासुख हेच राजाचे सुख. प्रजेचे हित हेच राजाचे हित, स्दतःच्या इच्छेची तृप्ति करण्यांत त्याचे हित नसते, तर प्रजेच्या इच्छेप्रमाणे वागण्यांत त्याचे हित असते.) अभ्यास :--१. मौर्यकालीन राजाचा एक दिवसाचा आदर्श कार्यक्रम सांगा. २. 'राजा'चा मुख्य हेतु काय? याप्रमाणे वागणाच्या कांहीं प्राचीन राजांची नांवे लिहा. ३. राजाच व्रते कोणती ? राजांनी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टीकडे. लक्ष दिले पाहिजे. ४. 'मनूने सांगितलेली राजाची कर्तव्ये (पुढील सुतार क्रमांक २४) व हा उतारा यांच्यातील साम्य भेद दाखवा. ३ सा.इ.