३०
- हिंदुस्थानचा साधनख्य इतिहास : . भारताचे वर्णन आणि शिकंदराच्या स्वारीचे विवेचनात्मक वृत्त । लिहिलें, अलेक्झांडरच्या अधिका-यांपैकीं लेगोस्चा मुलगा टॉलेमी, (Ptolemy) आणि त्याचे सहकारी यांच्या माहितीवर एरियनने
आपला ग्रंथ रचिला असल्याने, समकालीन वृत्तांताचे महत्त्व त्यास | आहे. पुरु राजाच्या सैन्याचा पराभव कसा केला गेला हयाचे वृत्त पुढे दिले आहे.] लहान परिघांत कोंडले गेल्याने हत्तींनीं शत्रूची व मित्रांचीहि खूप नासाडी केली. पुढे मागे पळतांना किंवा गोल फिरतांना त्यांच्या पायाखाली जें सांपडलें त्यांस त्यांनी तुडविले. याचा परिणाम म्हणून घोडदळाचा चुराडा झाला, कारण तेहि हत्तीभोवती असलेल्या थोड्या जागेत कोंडले गेले होते. कित्येक माहूत मारले गेले होते, कांहीं हत्ती जखमी झाले होते, थकल्यामुळे आणि माहुतांच्या मृत्यूमुळे युद्धांतोंल एका बाजूस ते राहिनात. झालेल्या वेदनांमुळे घाबरून ते शत्रुमित्रांवर (वाट फुटेल तिकडे जाऊन) घसरले व त्यांना पायतळी तुडविले आणि सर्व रीतीने संहार केला. परंतु मॅसिडोनियनांना (मागे) मैदान मोकळे असल्याने वाटेल तशी हालचाल करतां येई. हत्तींचा हल्ला आला कीं ते बाजूला सरत, आणि हत्ती परतले की त्यांचा पाठलाग करून बाणांच्या वर्षावाने त्यांस जर्जर करीत. भारतीय सैन्य या पशूच्या मध्येच होते, त्यामुळे ते (हत्तींच्या क्रोधास) फार मोठ्या प्रमाणांत बळी पडलें ! १ जेव्हां हत्ती अगदीं थकून गेले आणि त्यांचा हल्ला करण्याचा कांहीं उपयोग होईना, तेव्हां जहाजे जशी तीराला 'येतात त्याप्रमाणे ते शत्रूकडे तोंड करून ओरडत ओरडत मागे मागे परतू लागले. या वेळी शिकंदरने, शत्रूला चोहों बाजूनी घोडदळाने वेढले, आणि शक्य तितक्या सांघिक फळीने शत्रूवर हल्ला करण्यास पायदळास आज्ञा केली. यामुळे झालेल्या चकमकोंत भारतीयांचे बहुतेक घोडदळ खलास झालें. तीच पाळी भारतीय पायदळावर आली, कारण सर्व बाजूंनी मॅसिडोनियन आंत आंत येत चालले होते. यामुळे अलेक्झांडरच्या घोडदळाच्या वेढ्यांतून जेथे मोकळी जागा सांपडेल तेथून भारतोय सैनिक पळ काढू लागले. ...।