Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रकाशकाचे निवेदन

 प्रा. शं. दा. चितळे व प्रा. रा. वि. ओतुरकर या इतिहासाच्या अभ्यासकांनीं 'हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास' हा परिश्रमपूर्वक तयार केलेला ग्रंथ पुणे अ. वि. गृह संस्थेतर्फे प्रकाशित करण्यास आम्हांस आनंद होत आहे. कारण अशा साधनग्रंथांच्या वाचनाने मूलग्राही इतिहासाच्या अभ्यासाची आवड वाचकांच्या मनांत उत्पन्न होते. मराठ्यांच्या इतिहासावरील असे कांहीं साधनग्रंथ मराठीत आहेत. प्रा. रा. वि. ओतुरकर व कै. द. वि. आपटे यांनी संपादिलेला व आम्हीं प्रकाशित केलेला महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास हा ग्रंथ अशाच प्रकारचा आहे. परंतु समग्र हिंदुस्थानच्या इतिहासावरील साधनांचा संग्रह उपलब्ध नव्हता. त्याचा आरंभ या ‘साधनरूप इतिहासा'ने होत आहे ही आनंदाची गोष्ट होय.

 संपादकद्वयांनी मराठी, संस्कृत, इंग्रजी आदि भाषांतील ग्रंथांचे परिशीलन करून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आणि सामान्य वाचकांच्या आटोक्यात आणण्यासाठी त्यांतील उतऱ्याांची निवड केली व परकीय भाषांतील उताऱ्याचा मराठीत अनुवाद केला. मूळ ग्रंथ व ग्रंथकार यांचा परिचय, उताऱ्यांतील शब्दार्थ, प्रश्न इ. माहिती