पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ हिंदुस्थानची साधनरूप इतिहास दोधे मरूं. म्हणून मी भीत नाहीं. बोधिसत्त्वाने हें. आपल्या हृदयांतील ज्ञानायुधाबद्दल सांगितले होते.... |..:: हे ऐकून यक्षाने विचार केला : माणवक खरे बोलतो आहे, माझा कोठाः याचे तुकडाभर मांसहि पचवू शकणार नाहीं. द्यावे याला सोडून. मृत्यूच्या.. भयानें तो यक्ष बोधिसत्त्वाला म्हणाला, " मनुष्या, तू पुरुषसिंह आहेस. मी तुझे मांस खाणार नाहीं. आज तुं राहूच्या मुखांतून मुक्त झालेल्या चंद्रा-. प्रमाणे माझ्या हातून सुटून आपल्या मित्रमंडळीस प्रसन्न करण्यास जा." { यानंतर बोधिसत्त्वानें यक्षाला सदाचाराच्या गोष्टी सांगून , । सन्मार्गाने राहण्यास सांगितले. ] - अभ्यास:--१. तत्कालीन शस्त्रविद्येचे शिक्षण कोठे दिले जाई ? शस्त्रांचे प्रकार सांगा. तलवारीची लांबी किती होती ? ही शस्त्रे आजहि वापरली. जातात काय? शस्त्रबलाप्रमाणे आणखी कोणत्या बलाची आवश्यकता असते ? असे कोणतें बल किंवा शस्त्र पंचावुध कुमाराजवळ होते ? २. प्राचीन काळी तक्षशिला येथे विद्याभ्यासाची कोणकोणती व्यवस्था होती त्याची माहिती मिळवा. ३ जंबूद्वीप म्हणजे कोणता देश ? । ११ : : समुद्रगमन . [ जातक कथांतील समुद्रगमन दर्शविणारी कांहीं वाक्ये येथे दिलीं । आहेत, वाक्यापुढे जातकाचे नांव आहे.] |१. वायूच्या लहरीप्रमाणे समुद्राच्या मध्यभागी असलेल्या बेटापर्यंत त्यांनी जलप्रवास केला. समुद्द-णिज्य जातक २. चार महिने खूप दूरच्या प्रदेशापर्यंत जहाज मार्ग क्रमीत आहे। आणि आतां जणू काय आधिदैविक सामर्थ्य प्राप्त झाल्याप्रमाणे, अवघ्या एका दिवसांत बंदरास ते परत आले. -सुप्परक जातक .. ३. एक दिवस त्याने विचार केला. 'माझी संपत्ति एकदां संपली की दान करण्यास माझ्याजवळ कांहींच राहणार नाहीं. ती शिल्लक आहे तोपर्यंत एक जहाज घेऊन सुवर्णदेशास जाऊन तेथून धन आणीन.' यासाठी त्याने जहाज बांधविलें, त्यांत व्यापाराच्या वस्तू ठेवल्या, बायकामुलांचा निरोप घेतला, बंदरच्या दिशेने चालून, दुपारी तो मार्गस्थ झाला.-संख्य, जातक