पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास घेतला असावा असे बौद्धधर्मीय मानतात. पण हे मत निर्णायक नव्हे. .. घट ' जातकांत भागवत कथा आलेली आहे. कृष्ण जन्मापासून | कंसाच्या हत्येपर्यंत, चाणूर, मुष्टिक इत्यादींचा वध हा कथाभाग ...त्यांत आहे. जातक कथांत पंचतंत्राचे मूळ आहे व इसापाच्या बहुतेक कथांचेहि मूळ त्याच कथा आहेत; या सर्व कथाचे ठिकाण भारतवर्ष असले पाहिजे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. प्राचीनत्व, विस्तार, उपदेश किंवा मनारंजन या दृष्टीने हे कथासाहित्य अद्वितीय आहे. या कथांतून तत्कालीन लोकजीवनाची माहिती मिळते. उठणे, बसणे, खाणे, पिणे अशा साध्या गोष्टीपासून ते आपली राजनीति, अर्थनीति आणि आपल्या समा जाच्या संघटनेचा विस्तृत इतिहास यांत पाहावयास मिळतो. त्या * : काळचे जलमार्ग, स्थलमार्ग याचीहि माहिती त्यांत आलेली आहे. | भदन्त आनद कौसल्यायन यांनीं ' हिदी जातक प्रथम खंडाला जी विस्तृत भूमिका लिहिली आहे त्याच्या आधारें हो जातक परिचय दिलेला आहे. त्याच पुस्तकांतील ‘पंचावुधजातका'चा अनुवाद. पुढे दिला आहे. जातक प्रथम खंड (प्रकाशक-हिंदी साहित्य सम्मेलन प्रयोग ) पृ. ३५४] पूर्वी वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त राजा राज्य करीत होता. त्याच्या राणीच्या पोटों बोधिसत्त्वाने जन्म घेतला. त्याच्या बारशास १०८ ब्राह्मणांना संतुष्ट केल्यावर, त्याची लक्षणे त्यांना विचारली गेलीं ....ब्राह्मण म्हणाले, “ महाराज, कुमार पुण्यवान व्याहे, तुमच्यानंतर तो राज्य प्राप्त करील. पंच शत्रे चालविण्यांत प्रसिद्ध होऊन, जम्बूद्वीपांत अग्रणी गणला जाईल. ब्राह्मणांचे म्हणणे ऐकून.. त्या कुमाराचे नांव पंचावुध कुमार ठेवले. त्याला कळू लागल्यानंतर आणि सोळावें वर्ष लागल्यावर, राजाने बोलावून सांगितलें-"बाळ, शिल्प शीक.” “देवा, कोणाजवळ शिकू ?" " कुमार, जा, गान्धार देशांत तक्षशिला * नगरीतील लोकप्रसिद्ध धाचार्याच्या जवळ जाऊन शिक. त्या आचार्यांना हे शुल्क दे." असे सांगून हजार मुद्रा देऊन त्यांस पाठविलें. त्याने तेथे जाऊन शिल्प शिकून, आचार्यांनी दिलेली पांच शस्त्रे घेऊन त्यांना नमस्कार करून, तक्षशिला नगरींतून निघून, पंचहत्यारबंद होऊन

  • सध्यांचे 'शाहाजीची टेरी' जिल्हा रावळपिंडी.