Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास स्थितप्रज्ञस्य का भाषा [ श्रीमद्भगवद्गीता हा हिदूचा मुख्य धर्मग्रंथ होय. जगांत जन्माला येणा-या प्रत्येक मनुष्यास अनेक प्रसंग असे येतात की, केव्हां कसे वागावे याविषयी संदेह उत्पन्न होतो. त्याचे उत्तर किंवा खरे म्हणजे उत्तर ठरविण्याची रीत सांगणारा ग्रंथ म्हणजे भगवद् गीता होय, मह.भारतांत हा सर्व विचार योगेश्वर श्रीकृष्ण व धनुर्धर पार्थ यांच्या संवादांत ग्रथित केलेला आहे. या संवादासच भगवद्गीता म्हणतात. सर्व उपनिषदांचे सार या ग्रंथांत ग्रथित झाले आहे असे अभ्यासकांचे मत आहे. जगातील सर्व प्रमुख भाषांत भगवद्गीतेचे भाषांतर झाले आहे. मराठीमधील श्रे ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी हा गीतेचा मराठींत अर्थ सांगणारा ग्रंथ होय. लो. टिळकांनीं ' गीतारहस्य' या आपल्या ग्रंथांत याच गीतेचा अर्थ विशद केला. गीतेमध्ये स्थितप्रज्ञ मनुष्याचे वर्णन दुस-या अध्यायांत श्लोक ५४ ते ७२ यांमध्ये केले आहे. त्यांतील ५४ ते ६१ व ६७ ते ७२ या श्लोकांचा लो. टिळकांनी केलेला अनुवाद पुढे दिला आहे. प्रारंभीं श्लोकांचे आंकडे दिले आहेत. ] अर्जुन म्हणाली :-- (५४) हे केशवा ! समाधिस्थ स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावे ? त्या स्थितप्रज्ञाचे बोलणे, बसणे व चालणे कसे असते ! (वें मला सांगा.) भगवान् म्हणाले:-- (५५) हे पार्था ! (मनुष्य) मनांतील सर्व काम म्हणजे वासना जेव्हां सोडतो व आपण आपल्या ठायींच संतुष्ट होऊन राहतो, तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. । (५६) दु:खांत ज्याच्या मनाला खेद होत नाहीं, सुखाचे ठायों ज्याची आसक्ति नाही, आणि प्रीति, भय व क्रोध हीं ज्याची सुटलीं, त्याला स्थितप्रज्ञमुनि म्हणतात. | (५७) सर्व गोष्टींत ज्याचे मन, नि:संग झाले, आणि यथाप्राप्त शुभाशुभाचा ज्याला आनंद किंवा विषादहि नाहीं, त्याची बुद्धि स्थिर झाली (म्हणावयाची).