Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

... धर्म-नारद संभाषण १९ राजा; तू आपल्या राज्याचा बळकट बंदोबस्त करून नंतर शत्रूवर चालून जातोस ना ? त्यांना जिंकण्यासाठी ते पराक्रम करतोस ना ? व जिंकल्यावर त्यांचे योग्य रीतीने रक्षण करतोस ना? ( ६५ ) तुझे अष्टांगांनी (रथ, हत्ती,घोडे,योद्धे,पायदळ,मजूर, हेर व मार्गदर्शक वाटाडे यांनीं) युक्त असलेले, चतुवध बलाचे सैन्य, शत्रूचा उच्छेद करण्यास समर्थ असून ते चांगल्या सेनापतींनी चालविलेलें व शत्रूचा नाश करणारे आहे ना ? (६६) राजा ! लोभी, चोर, शत्र किंवा कामाला नालायक अशीं माणसे तू कामाला नेमलीं नाहींस व्या ? (७८) चोर, लोभी माणसे, राजकुमार किंवा (राज) स्त्रिया यांच्यापासून किंवा खुद्द तुझ्यापासून राष्ट्राला पीडा होत नाही ना? शेतकरी संतुष्ट आहेत ना? (.७९ ) तुझ्या राज्यामध्ये मोठमोठे तलाव पाण्याने भरलेले व राज्याच्या भागाभागांत आहेत ना? तुझ्या राज्यांतील शेती केवळ पावसावर अवलंबून नाहीं ना ? (८०) । भरतश्रेष्ठा, तुझ्या राज्यामध्ये धनुर्वेदशास्त्र आणि नांगराच्या रक्षणाचे यंत्रशास्त्र यांचा उत्तम अभ्यास केला जातो ना? (१२३) निष्पापा! सर्व प्रकारची अस्त्रे, अभिचार ( ब्रह्मदण्ड म्हणजे जारण, मारण, उच्चाटन, इत्यादि अभिचारप्रयोग), विषयोग इत्यादि सर्व प्रकारचे शत्रूनाशाचे उपाय लुला विदित आहेत ना ? (१२४) । | युधिष्ठिरं म्हणाला, " महाराज जसे आपण सांगितले तसेंच करीत जाईन. (१३०) * अभ्यास :-१. पुढील मुद्यांविषयीं महाभारतकालीन विचार सांगा. {१) शिक्षक व शिक्षणाचे विषय (२) सेनापति व सैनिकांची कर्तव्ये ३) युद्धांत मृत झालेल्यांच्या कुटुंबियांचा परामर्श (४) शत्रूशीं वर्तन कसे ठेवावें? (५) शेती व शेतकरी (६) अर्थकोश (७) राजा-प्रजा संबंध. २. आधुनिक कालांत या कल्पनांत काय कमीअधिक झाले आहे याची चर्चा करा.