पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८ हिंदुस्थानची साधनरूप इतिहास ::::तुझा सेनापति आनंदित, शूर, बुद्धिमान, धैर्यशाली, पवित्र, कुलिन, तुझ्यावर प्रीति करणारा आणि दक्ष आहे ना ? (४८) तुझ्या सैन्यावरचे इतर अधिकारीहि सर्व प्रकारच्या युद्धांमध्ये निपुण, धैर्यवान, पवित्र, पराक्रमी असुंर्न तु त्यांचा सत्कार करून त्यांना मान देत असतोस ना ? (४९) मैन्याला शिधासामग्री आणि वेतन हीं वेळच्या वेळीं, यथायोग्य आणि देणे ठरली तशी तू देतोस ना ? तींत कमी करीत नाहींस न ? (५०), भत्ता थाणि वेतन सेवकांना देण्यास जर नियमित वेळेहून अधिक वेळ लागला तर ते सेवक़ अड़चणींत आल्याने जो अनर्थ करतात, तो फारच मोठा असतो. (५१) ६., मुख्यत.. 'राजकुलांतील सर्व पुरुष तुझ्यावर अनुरक्त असून ते युद्धामध्ये तुझ्यासाठी नेहमी प्राण टाकण्यास सिद्ध असतात ना ? (५२) युद्धविषयक अनेक कामें एकच अधिकारी सर्व बाजूंनी आपल्या मर्जीप्रमाणे तुझ्या आज्ञेबाहेर जाऊन व कामाच्या स्वाधीन होऊन करीत नाहीत ना ? (५३) जो पुरुष आपल्या पराक्रमाने उत्तम कामे करून आपल्या कामाला दाखवितो, त्याला अधिक मान, अधिक भत्ता आणि अधिक वेतन मिळते ना ? (५४) विद्येचे शिक्षण घेऊन ज्ञानसंपन्न झालेल्या पुरुषांना त्यांच्या त्यांच्या गुणांच्या योग्यतेप्रमाणें दाने देऊन तू त्यांचा परामर्ष घेतोस ना? (५५)

भरतश्रेष्ठा, तुझ्यासाठी मृत्यु पावलेल्या किंवा संकटांत सांपडलेल्या माणसांच्या बायकांचे तूं पोषण करतोस ना ? (५६) पार्था, शत्रु भयामुळे, दुर्बळपणामुळे किंवा तूं युद्धांत जिंकल्यामुळे तुझ्या आश्रयास आला असतां ते त्याचे पुत्राप्रमाणे रक्षण करतोस ना ? (५७) पृथ्वीच्या मालका, * पृथ्वीवरील सर्व प्रजाजनांना तूं आई-बापाप्रमाणे वागवितोस ना ? तुझ्याविषयी त्यांच्या मनांत शंका येत नाहीत ना ? (५८). भरतश्रेष्ठा, आपलं शंत्र व्यसनांत गुरफटला आहे असे ऐकताच तू आपल्या त्रिविध बलाचा नीट बंदोबस्त करून त्याच्यावर चालून जातोस ना ? (५९) शत्रुनाशना, शत्रूकडील सैन्यांतील मुख्य मुख्य अधिका-यांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे तू गुप्तपणे उत्तम उत्तम वस्तु पाठवीत असतोस ना ? (६२) : 1:1.: पार्था ( युधिष्ठिरा), अगोदर आपण आपलीं इंद्रिये ताब्यात ठेवून स्वतःला जिंकून नंतर इंद्रियं न जिंकल्यामुळे प्रमत्ते झाले. या शत्रूना तू जिकतोस ना ?.(६३) तू शत्रूवर चालून जाण्यापूर्वी साम, दाम, भेद, दण्ड या उपायांस यथाशास्त्र चांगल्या रीतीने योजीत असतोस ना ? (६४)