Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास नासे झाले आहेत. निशाचर प्राणी चोहोकडे संचार करू लागले आहेत. आणि हे तपोवनांतील मृग पुण्यक्षेत्ररूप आश्रम प्रदेशामध्ये पडले आहेत. सीते, नक्षत्रांनी भूषित झालेली रात्र प्राप्त झाली आहे, आणि चंद्रिका-- रूप प्रावरणांनी युक्त असलेला चंद्र आकाशामध्ये उदय पावलेला दिसत आहे. आतां जा, मी तुला अनुज्ञा देते. रामाच्या शुश्रूषेमध्ये तत्पर राहा. मधुर गोष्टी सांगून तू मलाहि संतुष्ट केले आहेस. वत्से शाझ्या समक्ष तू अलंकार धारण कर आणि दिव्य अलंकारांनीं शोभित होऊन मला आनंद दे. हयाप्रमाणे अनुसयेने सांगितल्यावर देवकन्येसमान असलेल्या सीतेने अलंकार घातले, आणि अनुसयेच्या चरणांना मस्तकानें प्रणाम करून ती रामाकडे निघाली. ऋषीपत्नी अनुसूयेने प्रेमपूर्वक दिलेल्या अलंकारांनी भूषित झालेल्या सीतेला अवलोकन करून वक्त्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या रामाला हर्ष झाला. तदनंतर कृषीपत्नीने वस्त्रे, भूषणे व पुष्पमाला प्रेमपूर्वक दिल्याचे सर्व वृत्त सीतेने रामाला निवेदन केले. तेव्हां मनुष्यलोकामध्ये अत्यंत दुर्लभ असा सीतेचा सत्कार झालेला पाहून रामाला व महारथी लक्ष्मणाला हर्ष झाला. नंतर सर्व तपस्वी जनांनी सत्कार केलेला तो रघुनंदन प्रसन्न होऊन चंद्रासारख्या आल्हादकारक मुखाने युक्त असलेल्या पवित्र सीतेला अवलोकन करून तो त्या रात्री तेथेच राहिला. अभ्यास :--१. सीतेचा सत्कार का व कसा केला ? २. श्रीरामाला कां आनंद झाला ? धर्म-नारद संभाषण [रामायण व महाभारत ही दोन महाकाव्ये म्हणजे समाजांतील आबालवृद्धांच्या मनावर उच्च विचारांचा ठसा उमटविणारे, सत्कृत्यांचे परिणाम व पापांचा शेवट स्पष्ट दाखविणारे, समाजांतील बहुविध व्यक्तीस एकाच संस्कृतीचे बाळकडू पाजणारे व त्यांच्या मनाला करमणूक व बोध देणारे असे ग्रंथ आहेत. महाभारतांत सामान्यतः एक लक्ष श्लोक आहेत. व्यासाने मूळ लिहिलेले भारत लहान असून पुढे त्यांत सौतीने भर घालून त्यास मोठे स्वरूप दिले. महाभारताचे