पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सायंकाळची सृष्टिशोभा १५ दुस-या कोणाला आजच्या आज या राज्याचा अभिषेक करा. कारण राजावाचून हे राज्य अरण्यवत् झालेले आहे. अभ्यास :--१. अराजक स्थिति म्हणजे काय ? चांगला राजा असतां प्रजा किती निर्भय राहू शकते याचे वर्णन या उता-याच्या आधाराने करा. २. राजाकडून लोकांच्या कोणत्या अपेक्षा असत? ३. मराठी राज्यस्थापनेपूर्वी महाराष्ट्रांतील स्थिति कशी होती त्याचे वर्णन करा. ४.'सुराज्य' यावर लहान । निबंध लिहा. ५. सुराज्य व स्वराज्याची प्राचीन कल्पना व अर्वाचीन कुल्पना यांत काय फरक आहे याची चर्चा करा. ६ । । सायंकाळची सृष्टिशोभा [ रामायणांत निर्सगाचीं अनेक सुंदर वर्णने आहेत. त्यांतील सायंकाळचे वर्णन येथे दिले आहे. त्याचप्रमाणे तत्कालीन शिष्टाचाराचे वर्णन यांत आलेले आहे. । मूळ उता-यांत वर्णन केलेल्याप्रमाणे रात्रीच्या आगमनाचा एक एक प्रसंग डोळ्यापुढे आणल्यास अरण्यांतील शांत रात्रीच्या आल्हाददायक चित्राशीं मन तद्रूप होते.] ...ती मोठी कथा श्रवण केल्यावर सीतेचे मस्तकी अवघ्राण करून धर्मवेत्त्या अनुसयेने आपल्या हाताने तिला कवटाळून धरले आणि ती तिला म्हणाली, " स्वयंवर कसे झालें हें तूं स्पष्ट शब्दांनी आणि आश्चर्यकारक व मधुर वाणीने सांगितलेंस आणि ते सर्व मी ऐकलें. हैं मधुरभाषिणी सीते, ह्या तुझ्या कथनाने मला फारच बरे वाटत आहे. परंतु आतां तेजस्वी सूर्य शुभ रात्रीला समीप आणवून अस्तास गेला आहे. सर्व दिवसभर अाहाराकारितां संचार करून संध्यासमयीं निद्रेकरितां निवासस्थानांत जाऊन बसलेल्या पक्षांचा ध्वनि कानावर येत आहे. उदकामध्ये ज्यांनी आपली वल्कलें वातली आहेत आणि स्नानामुळे ज्यांची शरीरें आई झालेली आहेत असे हे। हातांत कलश घेतलेले मुनी एकत्र जुळून येत आहेत. ऋषींनीं विधिपूर्वक अग्निहोम दिल्यामुळे पारव्यांच्या कंठासारख्या वर्णाचा व वायूने हालविलेला घर दष्टीस पडत आहे. बारीक पानांचे वृक्ष आसमंताद्भागीं सर्व बाजूंनी अगदी दाट झाल्यासारखे दिसत आहेत. आणि दूरचे प्रदेश दृष्टिगोचर होत