पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/45

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास

  • ठीक आहे. विचार. .... दुस-या प्रश्नाचेहि समर्पक उत्तर दिल्यावर गार्गी म्हणते " अहो पूज्य ब्राह्मणहो, या मुनीला नमस्कार करून तुम्ही येथून सुखरूपपणे गेलात तर तेच आपले मोठे भाग्य समजा. याने माझ्या अतिशय कठिण प्रश्नाचींहि योग्य उत्तरे दिली आहेत. यास्तव तुम्ही याचा पराभव करण्याचे मनांतहि आणू नका.

अभ्यास :--१. उपानिषद्कालीन विद्वानांच्या सभेचे हे वर्णन आहे. प्रश्न कोणी कोणीं विचारले ? २. जनकाने काय बक्षिस लावले होते ? यावरून त्या काळच्या समाजस्थितिसंबंधी काय माहिती मिळते ? अराजक राष्ट्राची दुःस्थिति [ रामायण व महाभारत हीं आर्याचीं महाकाव्ये होत. महाभारताचा रचनाकाल अनिश्चित आहे. पण कोणाच्याहि मते तो इ. स. पूर्वी १३०० हून अलीकडे येऊ शकत नाहीं. रामायणांतील श्रीराम हा दशावतारांपैकीं विष्णूचा सातवा अवतार व महाभारतातील श्रीकृष्ण हा आठवा अवतार होय. साहजिकच रामायणांत महाभारतापेक्षा प्राचीन कालाचे वर्णन सांपडते. मात्र रामायण हे काव्य महाभारताच्या आधीं रचले गेलें कीं मागाहून हे निश्चित सांगणे कठिण आहे. रामायण काव्याची रचना महाभारतानंतरची असावी असा विद्वानांचा तर्क आहे. रामायणकालांत आर्याचे हिंदुस्थानभर वसाहती करण्याचे कार्य चालू होते हैं रामायणांत दंडकारण्यांत राहणा-या अनेक ऋषींच्या आश्रमांचा जो उल्लेख आहे त्यावरून सिद्ध होते. भारतकालांत हे काम बहुधा पुरे झाले असावे. प्राचीन काली आर्याचे आचारविचार काय होते याचे वर्णन रामायणांत आढळते. या ग्रंथाचा लेखक वाल्मीकि यास संस्कृत भाषेमधील आद्य कवि मानतात. श्रीवाल्मीकीकृत मूळ ग्रंथाचे मराठी सुरस भाषांतर कै. काशीनाथशास्त्री लेले वाईकर यांनी केले असून गणेश विष्णू चिपळूणकर आणि मंडळी यांनी इ. स. १९०३ मध्ये ते प्रसिद्ध केले. त्याची दुसरी आवृत्ति इ. स. १९२८ मध्ये त्या संस्थेच्या चालकांनी प्रसिद्धिली. त्यांतील आयोध्यकांड सर्ग ६७ पृ. ३५९ वरील पहिला उतारा व सर्ग ११९ पृ.४८४ वरून दुसरा उतारा येथे दिलेला आहे. ]