Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सिंधूच्या खोल्यांतील संस्कृति मृताचा सांगाडा हा सांगाडा ज्या स्थितीत सांपडला त्यावरून या व्यक्तीस स्वाभाविक मरण आले नसावे. भूकंप किवा अपघात यांत सांपडून जागच्या जागीं तो मनुष्य दाबला गेला असावा असे अनुमान आहे. या सांगाड्यावरून तत्कालीन पुरुषाची सरासरी उंची पांच फूट साडेचार इंच असावी व | स्त्रीची सरासरी उंची चार फूट साडे चार इंच असावी असे निरीक्षकांचे मत आहे