पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास (३) जो आपल्या महत्त्वाने श्वासोच्छ्वास करणा-या आणि डोळे मिटणाच्या सर्व सृष्टीचा एकच ईश्वर आहे आणि जो हया द्विपाद आणि चतुष्पाद पशु वगैरेचा धनी आहे, त्या ‘सुखस्वरूप परमेश्वराची आम्ही सर्व प्रकारे उपासना करतों. (४) ज्याच्या सामर्थ्याने हिमालयासारखे पर्वत झाले आणि ज्याच्या महात्म्याने पृथ्वीसह समुद्र झाले असे म्हणतात, तसेच ज्याच्या सामर्थ्याने दिशा झाल्या, आणि ज्याच्या सामर्थ्याने उपदिशा झाल्या, त्या सुखस्वरूप परमेश्वराची आम्ही सर्व प्रकारे उपासना करतो. । (५) ज्याच्यामुळे स्वर्ग सामर्थ्यवान् झाला, आणि ज्याच्यामुळे पृथ्वी दृढ झाली, ज्याच्यामुळे स्वर्ग स्थिर झाला, आणि ज्याच्यामुळे आदित्य अंतरिक्षांत स्थिर झाला, जो आकाशांत उदक निर्माण करतो, त्या सुखस्वरूप परमेश्वराची आम्ही सर्व प्रकारें उपासना करतो. । (६) शब्द करणा-या, लोकांच्या संरक्षणाकरितां स्थिर केलेल्या तेजस्वी दावापृथ्वी मनाने ज्याला पाहातात, जेथे सूर्य उगवल्यावर शोभतो, त्य सुखस्वरूप परमेश्वराची आम्ही सर्व प्रकारें उपासना करतों. (७) ज्या महान् अग्न्यादि सर्व जगाला उत्पन्न करणारे आणि गर्भ धारण करणारे उदक सर्व जग व्यापते, ज्यापासून देवाचाहि प्राणभूत एक प्रजापति निर्माण झाला त्या सुखस्वरूप परमेश्वराची आम्ही सर्व प्रकारें उपासना करतो. (८) ज्याने यज्ञ उत्पन्न करणारे, प्रजापतीला धारण करणारे (प्रलयकालीन ) उदक उत्पन्न केले, व जो देवांतला एक मुख्य देव आहे, त्या सुखस्वरूप परमेश्वराची आम्ही सर्व प्रकारे उपासना करतो. (९) ज्याने पृथ्वी उत्पन्न केली आणि ज्या सत्यधर्मा प्रजापतीने स्वर्ग उत्पन्न केला, त्याने मला त्रास देऊ नये. ज्याने विपुल आणि आश्चर्यकारक उदकें निर्माण केली, त्या सुखस्वरूप परमेश्वराची आम्ही सर्व प्रकारें उपासना करतो. (१०) हे प्रजापते, तुझ्याशिवाय दुसरा कोणीहि उत्पन्न झालेल्या जगांत व्यापून नाहीं, ज्या इच्छेने आम्ही तुला हवि देतो त्या आमच्या इच्छा पूर्ण होवोत. आम्ही सर्व प्रकारच्या संपत्तीचे धनी व्हावे. अभ्यास :--१. यांत ईश्वराचे जे स्वरूप वणले आहे ते थोडक्यांत लिहा. २. ईश्वरापाशी प्रार्थना करून आर्यांनी काय मागितले ते सांगा.