पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/236

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धीराचा चिमाजी आप्पा २०७ कीर्ती संपादून पातशाहाचे कृपेस पात्र व्हावे याच अन्वये आजी आठ दहा वर्षे तीर्थरूप कैलासवासी राव यानी राजश्री सवाईजी यांचे हातून नवाव खानदौरा यांजसी संदर्भ लाविला होता कितेक करार मदाराच्या गोष्टी सवाईजीच्याच विद्यमाने होऊन आल्या होत्या. त्याचा परिणाम लागोन योजिला मनसुबा पातशाहाच्या चितानरूप सेवटास जावा तरी आमचा प्रसंग सरदारी सिपहाखर्च व किलेजात व बाजे कितेक कामे यामुले वोढगस्त सार्वभोमापासून मदतखर्च व कर्ज परिहारास द्रव्य प्राप्त होऊन उमदा मनसुबा करून बंदोबस्ताची सुरत करून दाखवावी तर ते गोष्टी त्याजकडून होऊन आली नाहीं द्रव्यावरी मनसुबा आमचा त्यामुळे सर्व सिथील पडले मध्ये कितेक विक्षेपही पडले तथापि रायांची उमेद पातशाही बंदगी' हासील करून घेऊन आपले करारमदारावर काईम राहावे हेच त्रिकर्णपुरसर होते तेच गोष्ट चितात आणून उदडही आशा नवाब आसफज्योहानी दाखवून सेद लस्करखान पाठविले त्यास तन्हा' देउन पूर्वीपासून जे जे गोष्टी चितावरी धरिली आहे तेच परिणामास लावून लोकोत्तर उत्तम करून दाखवावें दुस-या जवळून द्रव्यादीक विशेष प्राप्त जाहाले आणि सार्वभोमापासून काहीं न्यून मिळाले तरी तेच कबूल करावे आणि आपल्या वचनप्रमाणावर काईम राहावे याच अन्वयें रायाची आमची बोली दृढोत्तर होऊन तुम्हांस सवाईजीकडे पाठवावेसा निश्चय ठहराऊन ठेविला तदोत्तर रायांनी मालवियांत जावयाचा उदेश केला आम्हीं औरंगाबादेस गेलो उपरातोक रायानी तुम्हांस सवाइजीकडे रवाना केले रायानी बरानपुराहून कूच करून नेमाड खरगोण प्राते आले काकेरकर मवास' मुफसद ° होता त्याचे पारपत्य करून बंदोबस्त केला तदोत्तर कूच करून रेवा उतरून जाताच शरीरी पीडा वायोची होऊन वैशाख शुध त्रयोदशीस रायानी देहावसान केलें इश्वरे मोठी अनुचित गोष्ट केली. इश्वरी तंत्रास उपाय नाहीं जे जे काली ज्या ज्या गोष्टी घडून येणार तितक्याच घडतात सर्व गोष्टीस इश्वरी सत्ता प्रमाण आहे माणसाचे हाती तिलमात्र नाहीं परंतु विचारी दीर्घदर्शी लोक आहेत ते मनसुबियांचा पेश १ अंदेशाचा २ विचार चि (ति) तात व सवाई प्रमुख थोरथोर आहेत त्याचेही चितांत येणे ते आलेच १ संधान २ इतर. ३ व्यत्यय. ४ सेवा. ५ रुजू. ६ सर्वश्रुत. ७ त्याग करून. ८ नंतर. ९ बंडखोर. १० बंड करून. ११ पुढील. १२ धोरण. [५१ ।