पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/235

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०६ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास यानी उतर दिल्हे की राजाहि बहुतच खुबिया' राखतो. नबावानी उत्तर दिल्हे जे आम्ही आयिकिले जे कितेक गोस्टी हलकेपणाच्या आइकतो. यांनी उत्तर दिल्हे की ते मजलीसीसारखें २ न चालत तर राज्य कैसे राहते ? परंतु पोख्त शाहणे विवेकीं. जाबसाल उत्तम करिताती यैसे उत्तर झाले. अभ्यास :--शाहू व बाजीराव यासंबंधीं दीपसिंगाचे काय मत झाले ते सांगा. मूळांत निजामाचे मत काय होते ? २६ । । । धीराचा चिमाजी आप्पा {२ जून १७४० हिंगणे दप्तर खं. १ ला) पृ. १२, पत्र १५ वे ) [वाजीरावाच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनी चिमाजी आप्पाने पुण्याहून जयपूर येथील आपला वकील महादेवभट हिंगणे यास लिहिलेले हे पत्र चिमाजी केवढा धीराचा पुरुष व मुत्सद्दी होता व त्याला मराठ्यांच्या सामर्थ्याविषयी केवढा विश्वास होता हे दाखविणारे आहे. तसेच बाळाजी विश्वनाथाच्या वेळेपासून मराठे उत्तरेस कां धाव घेत, त्यांचे ध्येय काय याचीहि बरीच स्पष्ट कल्पना चिमाजीच्या पत्रावरून होते. पराक्रमी भावाच्या मृत्यूनंतर चिमाजीस शोक करीत बसण्यास फुरसद नाहीं. उत्तर हिंदुस्थानांतील आपल्या मित्रमंडळींत तो या पत्राने विश्वास निर्माण करीत आहे. पत्र काळजीपूर्वक अर्थ लावून वाचण्यासारखे आहे. --भा. इ. सं. मंडळ वर्ष २५, अंक १ ते ४,]। ....ऐशास पातशहाची सर्वप्रकारें कृपा संपादून घेथून पातशहाचा बंदोबस्त तुटला आहे कित्येक अमीर बेयेख्तियार होऊन जो जे जागा राहिला तो बराय ६ खुद खावंद आपणच यैसे मानून पातशहाचा हुकूम किमपि माना नाहीं. त्यास पातशाहाच्या येख्त्यिांत आणून पातशाही बंदोबस्त करू" रयेत गोर गरीबाची दुवा घ्यावी. मुलकाची मामुरी करून पातशाही खजान याची तरकी करून हिंदुस्थानच्या पातशाहाचा बंदोबस्त केलियाची लोकात १ खुब्या, युक्त्या. २ मुत्सद्दीमंडळीची बैठक. ३ येथून पत्रास उत्तर सुरू ४ घेऊ. ५ अधिकार नसलेले. ६ साठीं, जागीं. ७ भरभराट.८ भरभराट. ५०]