पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पहिल्या बाजीरावाची योग्यता २०५ जे, अकरा लाख मालवें व पंधरा लाख गुजरात येणेप्रमाणे करार केला. म्हणों लागले जे, मालवे तर तुमचे हातचे गेले. बंगस जाहला. जाब दिल्हा की तोच चितास येईल तर येणेप्रमाणे चुकवील अगर न चुकवीत, येख्तियार त्याचा आहे. नवाब म्हणो लागला की तुम्ही बंगशाचे घर अकरा लाख करून बुडविले. त्यास काय राहेल ? ' आपण मालवाचे सुबेदार होतो तेव्हां अगदी तीस लाख चालीस लाख वसूल होता, म्हणून नवाब बोलिले. यांनी अत्तर दिल्हे जे, तो अंक रुपया न देऊत आम्हांस काय गरज? मग गुजरातचा मजकर पुसिला कि गुजरातेस बांडे व गायकवाड धमधाम करतील तुम्ही प्रधान पंताचे विदमाने चुकविले हे कसे होत जाईल? यानी उत्तर दिल्हे जे करार पडला आहे कीं वांडे गायकवाड दाभाडे येतील त्यांस श्रीमंत राजश्री चिमाजी आपा व आम्ही एक होऊन त्यास तंबी करावी. मग बोलिले जे याचा इतबार ४ तुम्हांस आहे. आपणास येक काडीचा इतबार वाटत नाहीं. यानी उत्तर दिल्हे की, आम्हांस इतबार आहे. याचे आमचे वडिलापासून घरोबा आहे. आम्हासी बदलून गोस्ट सांगणार नाहीं. मग या गोस्टी सोडून घडी घडी पुसो लागले की सातारा महाराजापांसी मातबर मनसुबेबाज राजा ज्यास मानीतो ऐसा तुमचे नजरेस कोण आला ? यानी जाव दिल्हा की माहराजा जैसिंगजीनी मजला याच कामाबद्दल बहुत करून पाठविले जे बाजीराऊ पंडित प्रधान यांचे नांव मुलकांत मरदुमीचे फार आहे. परंतु गिरंदारी व मुदसदगिरी व मान आदर राज्यांत व बोलोन चालोन पोख्त कारबारी मनास आणून येणे म्हणोन पाठविले होते, ते आपण मनास आणिले. मग नवाब पुसो लागले कीं कोन्हास तुम्ही मातबर व पोख्तकार व साहेब तरतुद व राजा मेहरवान गिरंदार कोन्हास वलखिले ? दीपसिंगजीनीं उत्तर दिल्हे जे सिवाय बाजीराऊजी आणिक कोन्ही सत्यवचनी अगर प्रामाणिक अगर पोख्तकारी अगर चलनसाहेब -फौज दुसरा दिसत नाहीं. मग पुसिले जे, राजा खुद कसा आहे ? ।। १ माळव्याच्या सुभेदाराने मराठ्यांना अकरा लाख द्यावे असा केलेला करार परडवणार नाहीं. तीस चाळीस लाखांतून एवढे मराठयास दिल्यावर उरलेले प्रांताच्या कारभारास लागतील मग बंगषास काय राहील असा भावार्थ. २ एकंदर. ३ मार्फत. ४ विश्वास. ५ मिळवणे व संरक्षण करणे. ६ वजनदार. ७ चालती फौज धारण करणारा. [४९.