पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/233

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०४ २५ पाठविलेन्दीपसिंग यास धडपडत असे.लाचे राजकारण हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास । । : पहिल्या बाजीरावाची योग्यता पेशवे दप्तर मा. १०, क्रमांक ६६ / २७-१०-१७३० [पेशवे दप्तराचा दहावा विभाग हा पहिला बाजीराव व निजाम यांच्या प्रारंभीच्या संबंधांच्या कागदपत्रांचा संग्रह आहे. मराठ्यांच्या विरुद्ध चाललेले निजामाचे उद्योग, पालखेडला त्याचा बाजीरावाने पराभव केल्यापासून थोडे कमी झाले. परंतु मराठ्यांत कलागती लावून बाजीरावाचे पारडे हलकें करण्याची अनेक अयशस्वी कारस्थाने त्याने केली. निजामच्या या कूटनीतीची माहिती पेशव्यांचा औरंगाबाद येथील प्रतिनिधि गणेश बल्लाळ याने वेळोवेळी बाजीरावास कळविली आहे. पुढील पत्रहि त्याचेच आहे. . उत्तरेकडील जयपूरचा राजा सवाई जयसिंग हा दिल्लीचे राजकारण मराठ्यांना अनुकूल राखण्यासाठी धडपडत असे. त्याने आपले विश्वासू सेवक म्हणून दीपसिंग यास साता-यास एकंदर माहिती मिळविण्यासाठी पाठविले होते. दीपसिंग उत्तरेत जात असतां निजामास भेटून गेला. त्याचे गणेश वल्लाळाला कळलेले वर्णन पुढील पत्रांत आले आहे.] श्रीशंकर पुरवनी श्रीमन्त राजश्री प्रधान पंत स्वामीजी शेवेसी. विनंती उपर दीपसिंगजी भेटीस नबाबाचे गेले होते. मेजवानी वगैरे देऊन बहुमान (ने) मुख्य भेटला. पोटासी धरिले. मग येकांती बैसोन वर्तमान पुसिल की आम्ही जाणितो जे, सवाई जैसिंगजी सर्वाहून थोर, यानी तुम्हास शाहू राजियापासी पाठवावेसे काये काम होते ? तुम्हांसारखी थोर माणसाह यावेसे नव्हते, म्हणोन पुट देऊन १ भेट घेऊ लागले. त्यास यानी उत्तर दिए जे, माहाराजियांनी आम्हांस आपमते पाठविलें नाहीं. पातशाहांची आ होती जे, जाऊन मांडवगडास जप्तीत आणावा आनी शाहू राजियाकडे इत बारी मुतसदी पाठशून गुजरात व मालवियाचा बंदोबस्त करावा की नरम उतरून आलीकडे न येतेसे करावे, म्हणून पातशहाचे हुकुमावरून गेलों होता। म्हणून जाब दिल्हा. मग पुसों लागले जे कसे केलें, काय केलें ? यांनी निवेदिक १ पुष्टि देऊन, चढवून. २ विश्वासू. ३ मुत्सद्दी. ४८]