पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कान्होजीच्या सत्काराची तयारी २०३ श्री महाराज राजश्री छत्रपति स्वामीचे सेवेशी विनंती सेवक आज्ञाधारक बसवंत राऊ कृतानेक विज्ञापना. येथील वर्तमान तागायत कार्तिक शुध त्रयोदशी भोमवार पर्यंत येथास्थित असे विशेष. स्वामीनी आबाजी बाड याज बरावर आज्ञापत्रे सादर केली की राा कान्होजी आंगरे याचे भेटीचा प्रसंग आहे तरी सनगे तुरे व पदके येका दो प्रतीची याद पाठविली आहे, त्याप्रमाणे सिध करून पाठवणे. त्यावरून थोडी बहुत माहाली जे वस्ता होत्या त्या व आनिखी खरिदी करून शैवेसी पाठविल्या आहेत. त्याची माहालीची बखैर व सनगाप्रमाणे बजिनस जाबिता पाठविला आहे, त्याप्रमाणे पावलियाचे उत्तर द्यावया आज्ञा केली पाहिजे. यानंतर दर्शनचा प्रसंग दिसगतीचा देखिला ६ या करितां सनगे पाठवावयाचा अनमान केला होता, परंतु मागती समागम यैसा नाहीं, या करितां पाठविली असेत तरी बजिनस स्वामीनी ज्या प्रसंगास आणविला आहे तोच प्रसंग संपादिला पाहिजे. या उपरी येसा जिनस माहाली व खरीदीहि समई मिलणार नाहीं या करितां सेवेशी सूचना मात्र लिहिली असे. स्वामी सर्वज्ञ आहेत आपण शेवक आज्ञाधारक आहो हे विज्ञाप्ति. अभ्यास :--तत्कालीन राजभेटीचे प्रसंगीं भेटणारांना कांहीं तरी नजराणा घेऊन जावा लागे, परंतु राजांनाहि त्या भेटणारांच्या योग्यतेप्रमाणे परत भेट द्यावी लागे ही गोष्ट या पत्रावरून लक्षात येईल. कान्होजीला विशेष भेट देण्याची योजना शाहूनें का केली असावी ? | १ मंगळवार. २ मौल्यवान वस्त्र. ३ आणखी. ४ हकीकत. ५ तपशीलवार यादी. ६ आंग्रे यांचे भेटीस दिवस गत लागणार हे पाहून, असा अर्थ. [ ४७