पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०२ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास २४ । । । कान्होजीच्या सत्काराची तयारी पेशवे दप्तर भा. ७ क्र. २१] [८-११-१७१४ [महाराष्ट्रांत इतिहास-संशोधनाचा संघटित खाजगी उद्योग इ. स. १८७८ साली 'काव्येतिहाससंग्रह' मासिकाच्या प्रकाशनाने झाला असे . म्हणण्यास हरकत नाही. सरकारच्या ताब्यात असलेले मराठी राज्याचे पेशवे दप्तर अभ्यासकांस खुले व्हावे यासाठी खूप खटपटी झाल्या परंतु त्यास यश आलें नाहीं. अखेर पन्नास वर्षांनंतर म्हणजे इ. स. १९३० पासून सरकारने हे दप्तर खुले करण्यास सुरुवात केली. पेशवे दप्तर मूळ शनवारवाड्यांत होते. परंतु दुस-या बाजीरावाच्या कारकीर्दीत शनवारवाड्यास आग लागली तेव्हां ते तेथून घाईघाईने रेसिडेन्सींतून ठिकठिकाणी ठेविले गेले. इ. स. १८१८ त एल्फिन्स्टनने ते एकत्रित केले. त्यांत एकंदर १३००० रुमाल आहेत व त्यांत मुख्यतः इ. स. १७२९ ते १८१७ या काळचे कागद आहेत. पुढील काळांत यांत दक्षिण विभाग कमिशनरचे अहवाल, निरनिराळ्या सरदारांच्या वकिलांचीं दप्तरे, कुलाबकर आंग्-यांचे दप्तर, रत्नागिरीचे कोंकण दप्तर, सातारा छत्रपतीचे दप्तर इनाम कमिशनचे जमावदप्तर अशा रीतीने या दप्तरांची संख्या १३००० हून आतां ३५६३३ पर्यंत वाढली आहे. त्यांपैकी ८५५९ इंग्रजी, २७०४५ मराठी व २९ पशयन आहेत. या दप्तराचा अधिक परिचय प्रा. सरकार यांनी पेशवे दप्तराच्या प्रकाशनास एक छोटीशी प्रस्तावना लिहिली आहे तीत पहावा. सरकारने रियासतकार श्री. सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालीं 'पेशवे दप्तराची पाहणी करून त्यांतील निवडक कागदपत्र एकूण ४५ भागांत प्रकाशित केले. हे काम इ. स. १९३० पासून इ. स. १९३४ पर्यंत च होते. अद्यापहि अनेक महत्त्वाचे लेख अप्रकाशितच आहेत. संशोधकांनी यत्न केल्यास तेथे जाऊन हे कागदपत्र पाहण्याची आज व्यवस्था आहे. प्रकाशित झालेल्या पत्रांनी मराठेशाहींतील कित्येक प्रसंगांवर चांगला प्रकाश पाडला आहे. प्रस्तुतचे पत्र शाहूच्या खाजगीकडील नोकर वसंतराव खोजा याचे आहे. कान्होजी आंग्रे व शाह यांचा समेट बाळाजा विश्वनाथाने घडवून आणला, त्यानंतरची ही दोघांची पहिलीच भेट होय.] ४६]